BMC election 2022 : प्रभाग क्र 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवडकर यंदा कोण बाजी मारणार?, वाचा सविस्तर…
मुंबईपालिकेच्या प्रभाग क्रमांक 172 ची स्थिती काय आहे पाहुयात...
मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. यंदा याच श्रीमंत महापालिकेची निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. ही निवडणूकही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाचा (Hindusm) मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहू शकतो. त्याच अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात काही दिग्गज नेत्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ते उमेदवार सुरक्षित मतदारसंघांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 172 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात भाजपच्या राजश्री शिरवडकर (Rajshree Shirwadkar) यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
व्याप्ती
प्रभाग क्रमांक 172 ची व्याप्ती कोहिनूर सिटी रोड आणि सोनापूर लेन या परिसरात आहे. नौसेना विहार, पी.एम.जी.पी बिल्डिंग जय अंबिकानगर, फ्रेंड्स कॉलनी, किरोल रोड, ख्रिश्चनगाव या भागात हा प्रभाग येतो.
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | राजश्री शिरवडकर | 13731 |
काँग्रेस | उपेंद्र दोशी | 3875 |
शिवसेना | प्रकाश वाघधरे | 3778 |
मनसे | राजेश केणी | 473 |
राष्ट्रवादी | विशाल दुराफे | 212 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी |