AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंची केंद्रात वर्णी, आमदार नितेश राणे कोअर कमिटीत! भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटी गठीत केली आहे. त्यात आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आलंय. आज या कमिटीची बैठक मुंबईत पार पडली.

नारायण राणेंची केंद्रात वर्णी, आमदार नितेश राणे कोअर कमिटीत! भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची बैठक
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 10:56 PM
Share

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपनं शिवसेनेविरोधात दंड थोपटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशावेळी आता भाजपकडून मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकल्याचंच पाहायला मिळत आहे. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटी गठीत केली आहे. त्यात आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आलंय. आज या कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. (MLA Nitesh Rane on BJP’s Mumbai Municipal Election Core Committee)

भाजपच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटीवर अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेते या कमिटीत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कोअर कमिटीतील या नेत्यांचा अनुभव भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

आमदार नितेश राणे अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, नारायण राणे केंद्रात मंत्री बनल्यानंतर आमदार नितेश राणे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. आज पार पडलेल्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या 6 जागांसाठी भाजप वेगळी रणनिती आखणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपसाठी या 6 जागा प्रतिष्ठेच्या असणार आहे. या 6 जागांवरही भाजप दमदार उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही- पेडणेकर

कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवलं आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत, असं पेडणेकर म्हणाल्या.

शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करत राहू दे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत टाकले जात आहेत. तिकडे मृत्यूचं तांडव सुरु असताना भाजपच्या नेत्यांना निवडणुकीची काळजी लागली आहे, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला होता.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

संबंधित बातम्या :

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

MLA Nitesh Rane on BJP’s Mumbai Municipal Election Core Committee

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.