BMC Election : मुंबई महापालिकेच्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार! शिवसेनेवर गंभीर आरोप
सत्ताधारी महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत सत्तेत असलेली पण महापालिकेत विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसं आक्रमक भूमिका घेतलीय. मुंबई महापालिकेसाठी जाहीर केलेल्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार आहे. मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशावेळी चार दिवसांपूर्वीच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. अशावेळी राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेनेसोबत सत्तेत असलेली पण महापालिकेत विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसं आक्रमक भूमिका घेतलीय. मुंबई महापालिकेसाठी जाहीर केलेल्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात (High Court) जाणार आहे. मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
29 पैकी 21 काँग्रेस नगरसेवकांचे वार्ड आरक्षित
मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेल्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार आहे. मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. वार्ड आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा काढली जावी अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या दबावाखाली आयुक्तांच्या कार्यालयात वार्डांचे आरक्षण ठरले असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसच्या अल्पसंख्याक उमेदवारांचे वार्ड जाणिवपूर्वक आरक्षित केल्याचा आरोपही करण्यात आलाय. वार्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. वार्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीमुळे मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे. 29 पैकी 21 काँग्रेस नगरसेवकांचे वार्ड आरक्षित झाल्याने हरकती आणि सूचना दाखल करण्याबाबत ही बैठक पार पडली.
रवी राजा यांचा नगरविकास खात्यावर आरोप
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते रवी राजा यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला होता. ते म्हणाले, ‘वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केले. मुंबईत काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा केले आहे. वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची काँग्रेसची भावना असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत
अनुसूचित जातीसाठीचे राखीव मतदारसंघ
60,85,107,119,139,153,157,162,165,190,194,204,208, 215, 221, 15
15 प्रभागातून 8 प्रभाग स्त्रियांसाठी राखीव
139 अनुसुचित जाती महिला sc 190 अनुसुचित जाती महिला sc 194 अनुसुचित जाती महिला sc 165 अनुसुचित जाती महिला sc 107 अनुसुचित जाती महिला sc 85 अनुसुचित जाती महिला sc 119 अनुसुचित जाती महिला sc 204 अनुसुचित जाती महिला sc
अनुसूचित जमातीसाठीचे राखीव मतदारसंघ
55, 124
अनसूचित जमाती महिला राखीव
124 अनुसुचित जमाती महिलासाठी आरक्षित
सर्वसाधारण महिला आरक्षण
प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 172, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230,236
प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233, 234
सर्वसाधारण महीला आरक्षित प्रभाग क्रमांक – 44, 102, 79,11,50,154,155,75,160,81,88,99,137,217,146, 188, 148,96 ,9, 185,130, 232,53