‘मातोश्री’बाहेर आधी महापौरांची अभियंत्याला शिवीगाळ, नंतर शिवसैनिकांची मारहाण

या भेटीदरम्यान महापौरांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असून शिवसैनिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे. याबाबत अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली . मात्र असं काही झालंच नाही असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.

'मातोश्री'बाहेर आधी महापौरांची अभियंत्याला शिवीगाळ, नंतर शिवसैनिकांची मारहाण
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 7:55 PM

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री बाहेरील नाला बंदिस्त करण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे या ठिकाणी पाणी साचत असल्याने मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सकाळी पालिका अधिकाऱ्यांसह भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असून शिवसैनिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे. याबाबत अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली . मात्र असं काही झालंच नाही असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.

वांद्रे पूर्व कलानगर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्द्वव ठाकरे राहत असलेले मातोश्री निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाजूलाच खेरवाडी नाला आहे. हा नाला बंदिस्त करण्याचे काम सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु असल्याने मातोश्रीजवळील सिग्नल परिसरात नुकत्याच झालेल्या पावसात पाणी साचलं होतं. पावसात पाणी साचल्याने याचा त्रास मातोश्रीसह तेथील नागरिकांना होत आहे. याबाबत महापौरांनी आज सकाळी नाल्याला भेट दिली. या भेटी दरम्यान पालिकेचे अभियांत्रिकी सेवेचे संचालक विनोद चिठोरे, पर्जन्य जल विभागाचे उप मुख्य अभियंता विद्याधर खणकर उपस्थित होते. नाल्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने विभागात पाणी साचत आहे. मातोश्रीला याचा त्रास होत असल्याने शिवसैनिकांनी याचा जाब विचारला. संतप्त शिवसैनिकांनी अभियंत्यांना महापौरांच्या समोर जाब विचारला. यावेळी शिवसैनिक, महापौर आणि अभियंत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महापौरांनीही विद्याधर खणकर या अभियंत्याला शिवीगाळ केली. त्यानंतर शिवसैनिकांकडून खणखर यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.

यानंतर उप मुख्य अभियंत्यांना मारहाण झाल्याने इतर अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवेचे संचालक विनोद चिठोरे आणि विद्याधर खणकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. याबाबत मारहाण झालेल्या खणखर यांच्याशी संपर्क साधला असता मी माझे म्हणणे पालिका आयुक्तांच्या कानावर घातलं आहे, ते काय तो निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.

कला नगर जंक्शन जवळ पाणी साचत असल्याने लोकांच्या तक्रारी आहेत. खेरवाडी नाल्याचे काम संथ गतीने सुरु आहे. 5 मीटरचे काम राहिल्याने पण साचत आहे. त्यामुळे मी त्या नाल्याला आज सकाळी भेट दिली. त्या ठिकाणी मातोश्री आहे किंवा मी जातो, पाणी साचण्याचा आम्हाला त्रास होतो म्हणून भेट दिली नाही. अभियंत्यांला मारहाण झाल्याचं मला माहित नाही. माझ्यासमोर काही झालेलं नाही, असा खुलासा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.