BMC election 2022 : Ward 178 Kohinoor Mill | वॉर्ड 178 मधून शिवसेनेची उमेदवारी धोक्यात येईल का? कसं राहणार कोहिनूर मिल्सच गणित?
2017 ची निवडणूक वॉर्ड क्रमांक 178 मध्ये काट्याची टक्कर झाली होती. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारात खरी लढत झाली. त्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. फक्त 86 मतांनी शिवसेनेचे अमेय घोले निवडून आले. या निवडणुकीत काय गणित राहते, हे पाहावे लागेल.
मुंबई : मुंबई महापालिकेचे ( Mumbai Municipal Corporation) पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही सप्टेंबरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषीत होण्याची शक्यता आहे. वॉर्डांचे आरक्षण (Reservation) जाहीर झाले आहे. उभेच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड 178 मधून शिवसेनेचे (Shiv Sena) अमेय घोले हे निवडून आले होते. यावेळी ही जागा महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. वॉर्ड 178 मध्ये पार्सी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल या भागाचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 178 मध्ये 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदारांची संख्या 42 हजार 786 होती. पण, फक्त 24 हजार 492 नागरिकांनी मतदान केले. अमेय घोले या शिवसेनेच्या उमेदवारानं बाजी मारली. यावेळी काट्याची टक्कर झाली होती. यावेळी कुणाला पक्षाची तिकीट मिळते. कोण अपक्ष उभे राहतात, यावर सर्व गणित अवलंबून आहे.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
2017 च्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतं
अमेय घोले (शिवसेना) 7,059 जेसल मनोज कोठारी (भाजप) 6,973 जनार्दन बाळाराम किर्दत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 4,483 जितेंद्र पांडरंग म्हात्रे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) 1290 वैभव दत्तायत्र करंदीकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1115 रघुनाथ थवई (अपक्ष) 1348
भाजप-शिवसेनेच्या उमेदवारात टक्कर
वॉर्ड क्रमांक 178 ची एकूण लोकसंख्या 51 हजार 535 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची 2 हजार 199 तर, अनुसूचीत जमातीची 714 लोकसंख्या होती. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार होती. आता या जनगणनेत वाढ झाली आहे. 2017 ची निवडणूक वॉर्ड क्रमांक 178 मध्ये काट्याची टक्कर झाली होती. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारात खरी लढत झाली. त्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. फक्त 86 मतांनी शिवसेनेचे अमेय घोले निवडून आले. या निवडणुकीत काय गणित राहते, हे पाहावे लागेल.
वॉर्डाचे आरक्षण
सर्वसाधारण महिला आरक्षण
या परिसराचा वॉर्डात समावेश
वॉर्ड 178 मध्ये पार्सी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल या भागांचा समावेश होतो.