नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला

मुंबई महापालिकेकडून (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती.

नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी  7 दिवसांत खुलासा मागवला
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 8:44 PM

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. नारायण राणे यांना ही दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नारायण राणे आणि महाविकास आघाडी (MVA) प्रामुख्यानं शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातंय. मुंबई महापालिकेनं यावेळी नारायण राणे यांना नोटीस पाठवताना फ्लोअर नुसार पाठवली आहे. बंगल्याच्या बांधकामात एसएफआयचं उल्लंघन झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या नोटीसमध्ये काय?

मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना मुंबई महापालिका कायदा, 1988 च्या कलम 351 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांना महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृतपणे बदल करण्यात आलेले आहेत, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. कोणत्या फ्लोअरवर काय बदल करण्यात आले याची यादीचं मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना नोटीसमध्ये पाठवली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून 21 फेब्रुवारीला पाहणी

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 21 फेब्रुवारीला दोन तास पाहणी केली होती. या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामासाठी ही पाहणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. बंगल्यात सीआरझेड आणि एफएसआयचं उल्लंघन झाल्याची तक्रार असल्याने महापालिकेने त्याबाबतचीही पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही होते.

निलरत्न बगंल्यावर कारवाईचे आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले होते.

इतर बातम्या:

असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच; चप्पल फेकण्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

Ranji Trophy ची सुरुवात शतकाने शेवट द्विशतकाने, यश धुलची बॅट तळपली तरिही दिल्ली स्पर्धेबाहेर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.