कंगना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार! कधी, कुठे, केव्हा आणि कशासाठी? वाचा सविस्तर!
शिवसेनेवर टीका करणारी कंगना शिंदेना भेटायला जाणार असल्यानं चर्चा तर होणारच..
दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Ekanth Shinde) वर्षा या निवासस्थानी उद्या (1 ऑक्टोबर, 2022, शनिवार) सदिच्छा भेट घेणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर कंगना पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Kangana will meet CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
शिवसेना विरुद्ध कंगना असा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता. कंगनाने ट्वीटरवरुन शिवसेनेवर आणि मुंबईवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
दरम्यान, आता अभिनेत्री कंगना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीय. मनसे पदाधिकारी यांचे मनिष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून ही भेट होत असल्याचं कळतंय.
दरम्यान हा वाद होऊन आता बरेच महिने उलटले आहेत. पण शिवसेनेची पंगा घेणारी कंगना शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार असल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलंय. ही सदिच्छा भेट असल्याचं जरी सांगितल जात असलं, तरी त्याचे अनेक अर्थ काढले गेले नाहीत, तरच नवल!
महाविकास आघाडी विरुद्ध कंगना असा वाद राज्यात गाजला होता. एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. यात शिवसेनेवर कंगनाने केलेली टीका ही फार चर्चेत आली होती.
दरम्यान, या सगळ्या वादानंतर कंगनाच्या खारमधील कार्यालयावर पालिकेनं कारवाई केली होती. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोपही कंगनाने केला होता.
आता शनिवारी संध्याकाळी कंगना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईल. या भेटीदरम्यान, नेमकी काय चर्चा होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेल्या काही दिवसांत कंगनाच्या राजकीय पक्षप्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या. या सगळ्या घडामोडीत शनिवारी होणारी कंगना-मुख्यमंत्री भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जातेय.