दसरा ठाकरेंचा, ‘दिवाळी’ शिंदेंची; ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वादावर कोर्टाचा मोठा निर्णय

ठाण्यात दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने आले होते.

दसरा ठाकरेंचा, 'दिवाळी' शिंदेंची; ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वादावर कोर्टाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 6:02 PM

मुंबई : दसरा ठाकरेंचा होता आता ‘दिवाळी’ शिंदेंची… असं म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे. ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वादावर मुंबई हाय कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ठाण्यात दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने आले होते. दोन्ही गटाला ठाणे महापालिकेने दिवाळी पहाट कार्यक्रमाची परवानगी दिली होती. मात्र, आता मुंबई हाय कोर्टाने ठाकरे गटाला दणका देत आता फक्त शिंदे गटालाच दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली आहे.

दसरा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात जोररदार वाद झाला होता. आता या वादाचा दुसरा अध्याय दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने पहायला मिळाला.

ठाण्यात मासुंदा तलाव शेजारील रस्त्यावर दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ होती. कार्यक्रम स्थळावरून दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. ठाणे महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी दिली होती.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहचले.

12 वर्षांपासून आम्हीच दिवाळी पहाटचा कार्यक्रम करत असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. अखेरीस कोर्टाने शिंदे गटाला दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास परवानगी दिली आहे.

दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.