Video | ‘अरे हात-तोडा पाय तोडा पण किरीटला गप्प बसवा’
Kirit Somaiya : 'तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा', असे आदेश मातोश्रीवरुन येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यावरुन (Attacked on BJP Leader Kirit Somaiya) भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केलेत. या हल्ल्याला आता आठवडा लोटल्यानंतर शुक्रवारी किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पुणे पालिका आणि महापौरांची भेट घेतली आणि लाईफलाईन कंपनीविरोधात घोटाळ्याचा आरोपांवरुन चर्चा केली. दरम्यान, यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Press conference of Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी थेट चॅलेंज केलंय. माझा आवाज दाबण्यासाठी, आपल्या वरील आरोप उघड होऊ नये, यासाठी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. ‘अरे हात पाय तोडा पण किरीटला गप्प बसवा’, असे आदेश ठाकरेंनी दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांवर (Shiv Sena MP Sanjay Raut) तिखट शब्दांत सोमय्यांनी टीका केली आहे.
‘तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा’, असे आदेश मातोश्रीवरुन येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पण किरीट सोमय्यांवर महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. त्याचा आवाज कधीच बंद होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
राऊतांना राऊतांची भीती
जी कंपनी अस्तित्वातच नाही अशा कंपनीला एकूण 13 कंत्राटं दिल्याचा आरोप, सोमय्यांनी केलाय. शंभर कोटींची काम दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. राऊतांना राऊतांचीच भीती वाटत असल्याचं सोमय्या म्हणालेत. तसंच संजय राऊत यांनी भीती ही प्रवीण राऊतांची असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर अनिल देशमुखांच्या शेजारच्या दोन कोठड्या सॅनिटाईज करुन ठेवा, असंही सोमय्या यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं म्हणत सोमय्या यांनी थेट आव्हान राऊतांना दिलंय. परळच्या हॉस्पिटलच्या बाहेर तो चहाची किटली विकणारा कोण आहे, हे सांगा ना? असं म्हणत राऊतांना डिवचलंय.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
Kirit Somaiya : ‘अमिताभ गुप्ता पुणे पोलिस आयुक्त नाही, तर ठाकरे-पवारांचा एजंट’ सोमय्यांचा आरोप
जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेलं बरं, मुख्यमंत्र्यांच्या मोर, सापाला फडणवीसांचं प्रत्युत्तर