AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 Ward No 94 Bharat Nagar H/East : बालेकिल्ल्यात शिवसेनेला मिळणार कडवी टक्कर; जाणून घ्या मतांचे गणित

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीची आकडेवारी पाहता शिवसेनेला या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही, असेच दिसतेय. कारण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा भुतकर यांना तीन पक्षांनी कडवी लढत दिली. यंदा भाजप मोठ्या ताकदीने आव्हान देण्याची तयारी करीत आहे. त्या अनुषंगाने ह्या वॉर्डातील निवडणूक फार लक्षवेधी असणार आहे.

BMC election 2022 Ward No 94 Bharat Nagar H/East : बालेकिल्ल्यात शिवसेनेला मिळणार कडवी टक्कर; जाणून घ्या मतांचे गणित
भाजप गड राखणार की शिवसेना, राष्ट्रवादी बाजी मारणार?Image Credit source: tv9
| Updated on: Jun 06, 2022 | 6:35 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी केली आहे. यंदाच्या या निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यापेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक महत्व मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण (Politics) सुरु आहे. त्याचे सावट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर दिसणार आहे. महापालिकेचा वॉर्ड क्रमांक 94 हा शिवसेने (Shivsena)चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील. त्यामुळे या वॉर्डमध्ये शिवसेनेचे पारडे जड मानले जाते. मात्र असे असले तरी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीची आकडेवारी पाहता शिवसेनेला या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही, असेच दिसतेय. कारण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा भुतकर यांना तीन पक्षांनी कडवी लढत दिली. यंदा भाजप मोठ्या ताकदीने आव्हान देण्याची तयारी करीत आहे. त्या अनुषंगाने ह्या वॉर्डातील निवडणूक फार लक्षवेधी असणार आहे.

मागच्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो?

2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या प्रज्ञा दीपक भूतकर यांनी बाजी मारली. त्यांना सर्वाधिक 8617 मते मिळाली. मात्र हा विजय मिळवताना त्यांना प्रमुख राजकीय पक्षांना कडवी झुंज द्यावी लागली. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुसऱ्या क्रमांकाची अर्थात 6942 मते मिळवली. तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ. स्नेहल जाजू (वर्दे) यांना 5535 मते मिळाली, तर भाजपच्या सोनाली तायशेटे यांना 5269 मते मिळाली होती. त्यासह इतर छोट्या पक्षांनी एकूण 1 हजारांवर मते मिळवली होती. निवडणुकीत 27851 इतकी वैध मते नोंद झाली होती. त्या मतांनी उमेदवारांचे भवितव्य ठरवले होते.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

मराठी मतदारांचे प्रमाण किती?

हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांचे भवितव्य बहुसंख्येने असलेल्या मराठी मतदारांच्या हाती आहे. कारण मागच्या निवडणुकीत मराठी मतदारांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांत चुरशीची लढत झाली होती. त्यात शिवसेनेच्या प्रज्ञा भुतेकर यांनी मताधिक्य मिळवले. प्रज्ञा भुतेकर यांचे पती दीपक भुतेकर हेदेखील याआधी नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आणि अनुभवाचा प्रज्ञा भुतेकर यांना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना फायदा झाला. त्या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेनाच आपला गड शाबूत ठेवते कि मनसे आपला झेंडा फडकावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वॉर्ड आरक्षित कि खुला?

यंदाच्या निवडणुकीची नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात वॉर्ड क्रमांक 94 हा सर्वसाधारणसाठीच खुला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे खुल्या प्रवर्गातून दमदार उमेदवार देऊन निवडणूक किती रंजक बनवताहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.