BMC election 2022 Ward No 67 Amboli Andheri : भाजप गड राखणार की महाविकास आघाडी सरशी करणार ? वाचा वॉर्ड क्र 67 मध्ये काय होणार ?

वॉर्ड क्र. 67 हा विस्ताराने मोठा आणि संमिश्र लोकवस्ती असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात हायप्रोफाईल सेलिब्रिटीही राहतात, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची झोपडपट्टी वस्तीही आहे. त्यामुळे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कामांचा समतोल साधावा लागतो आहे.

BMC election 2022 Ward No 67 Amboli Andheri : भाजप गड राखणार की महाविकास आघाडी सरशी करणार ? वाचा वॉर्ड क्र 67 मध्ये काय होणार ?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:00 AM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) जवळ आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यंदा मुंबई महापालिकेच्या वार्डमध्ये 9 वॉर्ड वाढवण्यात आले आहेत. यामध्ये 118 वॉर्ड महिलांसाठी राखीव (Reserved) ठेवण्यात आले आहेत. यापैकी वॉर्ड क्र. 67 ही सर्वसाधारण महिला आरक्षित ठेवण्यात आला आहे. ही निवडणूक (Election) महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप तिघांसाठीही अटीतटीची असणार आहे. पार्श्वभूमीवर नवीन प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्र. 67 मध्ये अंबोली, गावदेवी, नवरंग सिनेमा, डीएन नगर, भवन्स कॉलेज आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

वॉर्ड क्र. 67 हा विस्ताराने मोठा आणि संमिश्र लोकवस्ती असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात हायप्रोफाईल सेलिब्रिटीही राहतात, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची झोपडपट्टी वस्तीही आहे. त्यामुळे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कामांचा समतोल साधावा लागतो आहे. जेवढे काम हायप्रोफाईल लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करावे लागते, तितकेच लक्ष झोपडपट्टी वस्तीतील लोकांच्या समस्यांकडे द्यावे लागत आहेत. हायप्रोफाईल वस्तीमधील रस्ते स्वच्छ असतात, मात्र झोपडपट्टी वस्तीतील रस्त्याशेजारी कचऱ्याची ढीग असतात. तसेच या परिसरात सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अशा प्रमुख मागण्यांकडे या प्रभागातील मतदार लक्ष वेधताहेत.

कोणाला किती मतं ?

गेल्या पालिका निवडणुकीत भाजपच्या सुधा शंभूनाथ सिंह यांचा विजय झाला होता. यावेळी शिवसेनेकडून प्राची परब, काँग्रेसकडून वनिता कैलाश गुप्ता, मनसेकडून राधिका उडियार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या निवडणुकीत भाजपच्या सुधा सिंह यांना 10719, शिवसेनेच्या प्राची परब यांना 7587, काँग्रेसच्या वनिता मारुचा यांना 4243 तर राधिका उडियार यांना 968 मते मिळाली होती. सुधा सिंह यांनी 3132 मताधिक्य मिळवून दणदणीत विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

एकूण मतदार

मागच्या आकडेवारीनुसार वॉर्ड क्र. 67 मध्ये एकूण 52571 मतदार होते. त्यापैकी 23517 मते वैध होती.

भाजप आणि शिवसेनेत अटीचा सामना

गेल्या निवडणुकीत भाजपने पहिला क्रमांक मिळवून नगरसेवक पदाची माळ गळ्यात घातली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होता. आगामी निवडणुकीत महापालिकेत सत्ता राखण्याचं शिवसेनेपुढे आव्हान आहे. तर भाजपही महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहे. यामुळे वॉर्ड क्र. 67 मध्ये विजयाची माळ गळ्यात कोण घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.