दुसऱ्या पक्षात जाणार का?; रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी बोलून दाखवली

Ravikant Tupkar on Raju Shetti : मला शेतकऱ्यांसाठी लढायचंय, महाराष्ट्राभरात तरुणांची फौज उभी करायचीय; रविकांत तुपकर यांनी पुढचा इरादा सांगितला...

दुसऱ्या पक्षात जाणार का?; रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी बोलून दाखवली
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 10:21 AM

बुलढाणा | 08 ऑगस्ट 2023 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराजी असल्याची आणि ते संघटनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होतेय. यावर रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली. मी वारंवार तुम्हाला हा विषय सांगितला आहे. माझी नाराजी बोलून दाखवली आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असं रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना उद्देशून म्हटलं आहे.

मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

माझ्या शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय. त्यांच्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे त्यासाठी मी आजपासूनच कामाला लागलो आहे, असंही तुपकर म्हणाले.

मला शेतकऱ्यांसाठी लढायचंय, महाराष्ट्राभरात तरुणांची फौज उभी करायचीय, असंही तुपकर म्हणाले.

राजू शेट्टी यांना मी वारंवार या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी त्यांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे त्यांनी आता याबाबत निर्णय करावा. शेवटी माझी नाराजी ही वैयक्तित स्वार्थासाठी नाहीये. तर संघटनेच्या हितासाठी, वाढीसाठी मी या बाबी त्यांना कल्पना दिली आहे, असं तुपकर यांनी सांगितलं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन आणि कोअर कमिटीची पुण्यात आज बैठक होत आहे. या बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र रविकांत तुपकर बैठकीला जाणार नसल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोअर कमिटीची बैठक होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं, असं ते म्हणालेत.

पक्ष आणि संघटना फोडण्याचं अधिकृत काम भाजपचं आहे. स्वाभिमानी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे. कारण भाजपकडून त्यांना ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे, असा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.