Explain : संजय राऊतांच्या बंधुंना यावेळी विक्रोळीमधून हॅटट्रीक जमेल का? विजयाची शक्यता किती?

Vikhroli Assembly Constituency : विक्रोळी विधानसभा मतदारसंघात यावेळी काय होणार? मागच्या दोन टर्मपासून संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघातील समीकरण कशी आहेत? त्यांना विजयी हॅट्ट्रीक जमेल का?

Explain : संजय राऊतांच्या बंधुंना यावेळी विक्रोळीमधून हॅटट्रीक जमेल का? विजयाची शक्यता किती?
Eknath Shinde-Sunil Raut
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:14 PM

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील निवडून आले. त्यांना ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली होती. विक्रोळी मराठी बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात इमारती, चाळी मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभेला महायुतीने इथून भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली होती. गुजराती-मराठी अशा भाषिक फरकामुळे विक्रोळीतून संजय दीना पाटील यांना मोठ मताधिक्क्य मिळालं. पण विधानसभेला अशीच स्थिती राहील याची खात्री देता येत नाही. कारण विधानसभेला महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटतो? त्यावर उमेदवार ठरवला जाईल. शिवसेना-भाजपा युतीमध्ये नेहमीच हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर 2008 सालच्या मतदारसंघ पूर्नरचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी विक्रोळी मतदारसंघा भांडूप विधानसभेचा भाग होता. 2004 आणि 2009 चा अपवाद वगळता नेहमीच या मतदारसंघावर शिवसेनेच वर्चस्व राहिलं आहे. 1990 साली सर्वप्रथम लीलाधर डाके या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी काँग्रेसच्या दिना मामा पाटील यांचं वर्चस्व मोडीत काढत विजय मिळवला. त्यानंतर 1995 साली लीलाधर डाके यांनी मनोरमा दिना पाटील यांचा पराभव केला. 1999 साली दिना पाटील यांचे सुपुत्र संजय पाटील यांचा लिलाधर डाकेंनी पराभव केला. पण 2004 मध्ये समीकरण बदललं. त्यावेळी संजय दीना पाटील यांनी मागच्या सर्व पराभवांचा वचपा काढत लिलाधर डाके यांना पराभूत केलं. 2004 साली संजय दीना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जिंकले. 2009 मध्ये मनसेच्या मंगेश सांगळे यांनी इथून निवडणूक जिंकली.

संजय राऊतांच्या बंधुंसाठी ही निवडणूक सोपी नाही

2014 पासून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून संजय राऊत यांचे धाकटे बंधु सुनील राऊत या मतदारसंघातून आमदार आहेत. 2014 आणि 2019 अशी सलग दोनवेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. आता 2024 मध्ये सुनील राऊत यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, नगरसेवक यामुळे नेहमीच शिवसेनेच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. पण आता अशी स्थिती नाहीय. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे आणि चंद्रावती मोरे हे शिंदेंसोबत गेले. विधानसभेसाठी शिंदे गटातून सुवर्णा करंजे आणि विलास पारकर हे इच्छुक आहेत. भाजपामधूनही विक्रोळी मतदारसंघातून माजी नगरसेवक मंगेश पवार तसेच माजी आमदार मंगेश सांगळे तिकीटासाठी प्रयत्न करतायत. मनसेकडून विनोद शिंदे इच्छुक आहेत. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूक सुनील राऊत यांच्यासाठी सोपी नसेल.

विक्रोळी एकूण मतदार किती?

विक्रोळीत एकूण मतदारांची संख्या 2 लाख 41 हजार 114 आहे. या मध्ये पुरुष मतदार 53 टक्के तर स्त्री मतदारांची टक्केवारी 47 टक्के आहे.

विक्रोळीत समस्या काय?

विक्रोळीमध्ये अनेक पायाभूत समस्या आहेत. जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रश्न आहेत. सरकारने हा भाग सीआरझेडमध्ये टाकलाय. म्हणून जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.