माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी! 17 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरी जाऊन हात पाय तोडण्याची भाषा केली होती. या धमकी प्रकरणात आता खेड पोलिसांत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी! 17 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 7:46 PM

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात जोरदार आंदोलन (Agitation) केलं होतं. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरी जाऊन हात पाय तोडण्याची भाषा केली होती. या धमकी प्रकरणात आता खेड पोलिसांत (Khed Police) 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 17 जणांच्या यादीत गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अतिउस्ताही कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना धमकी

राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्याला लावला होता. तसंच त्या फोटोला चप्पलने मारत, गाढवाला चपलाचा हारही घातला होता. त्यानंतर आढळराव पाटील यांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकंच नाही तर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आढळराव पाटलांच्या घरी जाऊन त्यांचे हात पाय तोडू अशी धमकी दिली होती. या धमकीवरुन खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूसंय का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून माझी थेट हकालपट्टी केली. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बातमीही प्रकाशित झाली आणि नंतर आमच्याकडून चुकीनं हकालपट्टीची बातमी प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं. चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूस आहे का, असा सवाल शिरूरचे माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून मी अभिनंदन केलं. पण पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात हकाल पट्टी केली. 15 वर्षांपासून मी पुण्यात शिवसेना रुजवतोय पण एका पोस्टमुळे शिवसेनेकडून अशी कारवाई करण्यात येतेय, याचं मोठं दुःख असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.