अमित शाह यांच्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग, पाहा नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विमान प्रवास करत असताना अचानकपणे त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. कारण काय? वाचा...
गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विमान प्रवास करत असताना अचानकपणे त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Amit Shah Plane Emergency Landing) करावं लागलं. काल रात्री अमित शाह त्रिपुरासाठी प्रवास करत होते. आगरताळा इथल्या महाराजा बीर बिक्रम (एमबीबी) विमानतळावर अमित शाह यांचं विमान लँन्ड होणार होतं. पण दाट धुक्यांमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे अमित शाह यांचं विमान गुवाहाटीतल्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (Bordoloi International Airport) वळवण्यात आलं. अन् तिथे ते लँन्ड करण्यात आलं.
अमित शाह काल रात्री आगरताळ्याला पोहोचणार होते. आज त्रिपुरातील दोन रथयात्रांमध्ये अमित शाह सामील होणार होते. पण त्याआधीच विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
विमानाचं इमर्जन्सी लँडिंग का करावं लागलं?
अमित शहा काल रात्री 10 महाराजा बीर बिक्रम विमानतळावर पोहोचणार होते. परंतु दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता कमी झाली. अन् हे विमान महाराजा बीर बिक्रम विमानतळावर पोहोचू लॅन्ड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे विमान गुवाहाटीतल्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं, अशी माहिती पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधीक्षक शंकर देबनाथ यांनी दिली आहे.
त्रिपुरातील धर्मनगर आणि सबरूम उपविभागातून रथयात्रेला अमित शाह हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अमित शाह आज सकाळी 11 वाजता आगरताळ्यात पोहोचतील, असं भाजपचे त्रिपुराचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे.
यंदा त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी पक्षाची मोट बांधण्यासाठी अन् येत्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अमित शाह त्रिपुरात आहेत. तिथे पक्षातील नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. निवडणुकीची पाया भरणी करण्यासाठी अमित शाह आज त्रिपुरात असल्याचं बोललं जात आहे.