आता कुठं बॉक्स उघडलाय, खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात : छगन भुजबळ

आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असे संकेत राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. (Chagan Bhujbal said  many leaders will quit form BJP in future)

आता कुठं बॉक्स उघडलाय, खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 1:20 PM

नाशिक : “आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते. भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे या चर्चा बंद होतील.” आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. (Chagan Bhujbal said  many leaders will quit form BJP in future)

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. भाजपने आता खडसेंची काळजी करु नये. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित आहे. खडसेंनी 40 वर्ष भाजपची सेवा केली. त्यांना गेल्या चार पाच वर्षात भाजपने अपमानित केलं. आमच्याकडून तसे घडणार नाही असं भुजबळ म्हणाले.  एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार योग्य वेळी त्यांना न्याय देतील, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. सरकारने 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केली असती तरी त्यावर विरोधकांनी टीका केली असती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवयाची आहे, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे येणे असलेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना अजून मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील ज्येष्ठ नेते विनायक दादा पाटील यांचे निधनानं दु:ख झाल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. विनायक दादा पाटील यांनी वनक्षेत्र आणि सामाजिक काम मोठ्या प्रमाणात केले होते, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या :

VIDEO | एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाथाभाऊंचं राष्ट्रवादीत स्वागत, त्यांचा पक्षाला फायदा होईल: छगन भुजबळ

(Chagan Bhujbal said  many leaders will quit form BJP in future)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.