‘किरीट सोमय्या मला घाबरतो, समोर आला तर मी त्याला मारेन’, शिवसेना नेत्याची जीभ घसरली; शक्ती कपूरचीही दिली उपमा
राज्यात विविध भागात सोमय्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेलक्या शब्दात सोमय्यांवर टीका केलीय. यावेळी खैरे यांची जीभ घरसल्याचंही पाहायला मिळालं.
औरंगाबाद : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगताना पाहायला मिळतोय. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर आता राऊतही आक्रमक झाले आहेत. INS विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या आरोपानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध भागात सोमय्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शेलक्या शब्दात सोमय्यांवर टीका केलीय. यावेळी खैरे यांची जीभ घरसल्याचंही पाहायला मिळालं.
किरीट सोमय्या मला घाबरतो. एकदा विमानात मी त्याचा घात पकडला होता. मी त्याला काय किरीट म्हणतो. तो सतत हा हु हा हु करत असतो. त्यामुळे मी त्याला शक्ती कपूर म्हणतो. माझ्या समोर आला तर मी त्याला मारेन. मी मतांची खंडणी घेतली, पैशांची नाही. माझ्यावर ईडी पडू शकत नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. तसंच आपल्यावर ईडीची पिडा होऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी केलाय.
सोमय्यांविरोधात पोलीस ठाण्यात ठिय्या
किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. सोमय्या यांच्याविरोधात खैरे यांनी तक्रारही केलीय. सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण उठणार नाही, असा पवित्रा खैरे यांनी घेतला होता.
नाशिकमध्ये सोमय्यांच्या निषेधाची तिरडी!
नाशिकमधील शालिमार भागात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. येथेच सोमय्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यासाठी एक तिरडी बांधण्यात आली. गाडग्यात पेटलेल्या गोवऱ्या ठेवून शिकाळे तयार करण्यात आले. प्रतिकात्मक अंत्ययात्रेची सारी तयारी झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धाय मोकलून उर पिटून मोठ्याने रडारडी केली. ही अचानक सुरू झालेली रडारडी पाहून रस्त्यावरून जा-ये करणारे अनेक पादचारी आणि वाहनचालक क्षणभर थबकले. खरेच कोणी गेले की काय, याचीही अनेकांनी चौकशी केली. मात्र, हे आंदोलन असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा निश्वासही सोडला. मात्र, या आंदोलनाची चांगलीच चर्चा यावेळी झाली.
पुण्यात असत्यमेव जयते फाशी आंदोलन
पुण्यातील शिवसेनेच्या वतीनं असत्यमेव जयते फाशी आंदोलन करण्यात आलं. यावेळी किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला. INS विक्रांतमध्ये निधीचा अपहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलाय. अशावेळी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जाहीर फाशी आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील संत कबीर चौकात हे आंदोलन झालं.
इतर बातम्या :