“राहुल शेवाळे एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता, त्याची बायको रडत आली, उध्दवसाहेबांनी ती भानगड मिटवली”
राहुल शेवाळे आणि संतोष बांगर यांच्यावर वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) आदित्य ठाकरे यांचं नाव असल्याचा आरोप केला. त्यानंतर ठाकरेगटाच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय. चंद्रकांत खैरे यांनीही राहुल शेवाळे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
राहुल शेवाळे आणि संतोष बांगर यांच्यावर वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल शेवाळे याची अनेक लफडी आहेत. हा एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता. त्यावेळी याची बायको उध्दव साहेबांकडे रडत आली होती ती भानगड उध्दव साहेबांनी मिटवली होती, असं खैरे म्हणाले आहेत.
सुशांतसिंह राजपूत केसबाबतही राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, असं शेवाळे म्हणालेत. त्यावर आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर काल टीका केली होती. संजय राऊत पिसाळलेला कुत्रा आहे, असं बांगर म्हणाले होते. त्यालाही खैरेंनी उत्तर दिलं आहे.
संतोष बांगर मटका आणि पत्त्यांचे क्लब चालवून दिवसाला एक लाखाचा हप्ता घेणारा माणूस आहे. संतोष बांगर यांच्यावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. संतोष बांगरला आम्ही सरळ करू, असं खैरे म्हणालेत.