AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत कोणाचा बाप, हे दोन लोकसभा निवडणुकांत सर्वांनी पाहिलं, शशिकांत शिंदेंवर चंद्रकांत पाटलांचा प्रतिहल्ला

जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात, असा प्रतिहल्ला चंद्रकांत पाटील यांनी शशिकांत शिंदेंवर चढवला

दिल्लीत कोणाचा बाप, हे दोन लोकसभा निवडणुकांत सर्वांनी पाहिलं, शशिकांत शिंदेंवर चंद्रकांत पाटलांचा प्रतिहल्ला
| Updated on: Oct 14, 2020 | 6:19 PM
Share

मुंबई : “दिल्लीत कोणाचा बाप आहे, ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेले आहे! त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करु नये” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (handrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उत्तर दिलं आहे. “तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल शशिकांत शिंदे यांनी विचारला होता. (Chandrakant Patil answers Shashikant Shinde warning about commenting on Father)

“आम्ही शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो, आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ. दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, हे तुम्हीसुद्धा पाहिलंय!” असं चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

“आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आमचा मायबाप आहे. दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, त्यांच्या फायद्यासाठी असणऱ्या या विधेयकाला विरोध करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करुच!” असंही चंद्रकांत पाटलांनी लिहिलं आहे.

“राहिला प्रश्न दिल्लीत कोणाचा बाप आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेले आहे! त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करु नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दुष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी” असा प्रतिहल्लाही चंद्रकांतदादांनी चढवला.

(Chandrakant Patil answers Shashikant Shinde warning about commenting on Sharad Pawar)

शशिकांत शिंदे काय म्हणाले होते?

“चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. हल्ली त्यांच्या वक्तव्यांमध्ये बेस नसतो. तुम्ही इतरांचे बाप काढणार, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का? कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल” असा इशारा शशिकांत शिंदे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिला.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कायदे आहेत. त्यांना विरोध करणारे शेतकरीविरोधी आहेत. त्यांना शेतकरी गरीब राहावा, असं वाटतं. अद्याप महाराष्ट्रात त्या कायद्याला विरोध झालेला नाही, जरी राज्य सरकारनं स्थगिती दिलेली असली तरी ती कोर्टात जाऊन 8 ते 10 दिवसांत उठवू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांना अशी स्थगिती देताच येणार नाही. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्थगितीनंतर लगेच फतवा काढला. आता आम्ही बाजाराच्या बाहेर माल विकणाऱ्यांकडून सेस गोळा करणार, यांच्या काय बापाची पेंड आहे काय?, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता.

संबंधित बातम्या :

“चंद्रकांतदादा, विचारपूर्वक वक्तव्य करा, नाहीतर…” राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंचा पुन्हा हल्लाबोल

आधी चंद्रकांतदादांनी पवारांचा ‘बाप’ काढला; आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर

(Chandrakant Patil answers Shashikant Shinde warning about commenting on Father)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.