…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामनातील मुलाखतीवर टीका केली (Chandrakant Patil on Sharad Pawar).
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामनातील मुलाखतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे (Chandrakant Patil on Sharad Pawar Election result). त्यांनी शरद पवार यांच्या निवडणुकीतील निकालाच्या वक्तव्यांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हानही पवारांना दिलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.”
“पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना भाजपच्या सत्तेचा दर्प वाटला नाही, असंही म्हटलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
‘सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे लवकरच कळेल’
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “त्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडला असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल. सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल.”
हेही वाचा :
शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार
शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त… : शरद पवार
फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही : शरद पवार
Chandrakant Patil on Sharad Pawar Election result