राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी; भाजपची महाविकास आघाडीवर टीका
राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक पॅकेजेस जाहीर केले. पण राज्य सरकारने कुठलंही पॅकेज दिलं नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
अमरावती : “राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक पॅकेजेस जाहीर केले. पण राज्य सरकारने कुठलंही पॅकेज दिलं नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते जिल्ह्यात पक्षाच्या कामासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते. (chandrakant patil criticizes state government said government fails in all aspects )
ते म्हणाले, “कोरोना काळात केंद्र सरकारने अनेक पॅकेज दिले. पण राज्य सरकारने या काळात कुठलंही पॅकेज दिलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार कोरनापासून ते सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. कोरोनाकाळात जे विद्यार्थी पदवी घेतील, त्यांच्या उल्लेख कोरनाकाळातील पदवी असा होईल. राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.”
राज्यात सामाजिक अस्थिरता आणि दंडुकेशाही सुरु
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवर भाष्य केले. राज्यात सामाजिक अस्थिरता आणि दंडुकेशाही सुरु असल्याचं ते म्हणाले. तसेच, पत्रकार आज सुपात आहेत; उद्या जात्यात असतील असं म्हणत त्यांनी राज्य सरकार तसेच पोलिसांवर टीका केली. शिवसेनच्या मुखपत्रात झालेल्या टीकेवर बोलताना आम्ही या टीकेला गंभीरपणे घेत नाही असे म्हणत ते मुखपत्र कोण वाचतं असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, चंद्रकांत पाटील पक्षबांधणीच्या कामासाठी अमरावती जिह्यात आले होते. यावेळी त्यांनी अमरावती विभागाच्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोना काळातसुद्धा आमच्या संघटनेचं काम व्हर्च्यूअल माध्यमातून सुरुच होतं. आता आम्ही बाहेर पडलो आहोत. आमच्या पक्षाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरु झाले आहे. आम्ही त्यांची मतं जाणून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
संबंधित बातम्या :
अर्णवच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू : चंद्रकांत पाटील
अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही, पोपट तेच पाळतात : चंद्रकांत पाटील
(chandrakant patil criticizes state government said government fails in all aspects)