AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?

गिरणी कामगाराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रवास राहिला आहे. (chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 5:53 PM

मुंबई: गिरणी कामगाराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रवास राहिला आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थित शिक्षण घेत आणि सर्व संकटांवर मात करत चंद्रकांतदादांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा चंद्रकांतदादांचा प्रवास कसा झाला? त्याचा घेतलेला हा आढावा. (chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

प्रभुदास चाळीत बालपण

चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. चंद्रकांतदादा मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर गावाचे आहेत. परंतु मुंबईमधील रे रोडमधील नारवाडीतील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. घरात आठराविश्व दारिद्रय होतं. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली.

अभाविपमध्ये सक्रिय

तर विद्यार्थीदशेपासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम सुरू केलं होतं. तब्बल 13 वर्षे ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. 1977 पासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. 1980 ते 82 मध्ये ते अभाविपचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा मंत्री झाले. त्यानंतर प्रदेशमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे अभाविपचे क्षेत्रीय संघटन मंत्रीही झाले. 1984 मध्ये त्यांनी विद्यापीठीय निवडणुकांचा तोंडवळा बदलण्यात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर त्यांची अभाविपचे भारतीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने त्यांचे देशभर दौरे होऊ लागले. त्यातून ओळखीही झाल्या.

मुंबईतील खोली विकली, पुढे काय?

1993मध्ये पाटील यांच्या वडिलांनी मुंबईतील खोली विकली आणि ते खानापूर तालुक्यातील गारगोटी या मूळ गावी स्थायिक झाले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घर विकावं लागलं. त्यानंतर गावात जावून काही तरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी त्यांनी काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलं. कोल्हापुरात स्पर्धा परिक्षेला बसणाऱ्यांसाटी विद्या प्रबोधिनी क्लास सुरू केले.

शालेय वयापासूनच संघात

चंद्रकांत दादा हे शालेय वयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. परंतु 1995 ते संघात अधिक सक्रिय झाले. या काळात त्यांनी संघाचे कोल्हापूर विभागाचे कार्यवाहक म्हणून काम पाहिलं.

महाजन, गडकरींमुळे भाजपमध्ये

संघात काम करत असतानाच प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्याशी चंद्रकांतदादांचा संपर्क झाला. महाजनांनी तर त्यांना थेट भाजपमध्ये काम करण्यासही सांगितलं. भाजपमध्ये आल्यानंतर चंद्रकांतदादा पुढे 2004मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस झाले.

पहिली निवडणूक

चंद्रकांतदादांनी 2008 मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या पहिल्याच निवडणुकीत ते प्रतिस्पर्धी उमेदवार शरद पाटील यांचा 9 हजार मतांनी पराभव करून विजयी झाले. त्यानंतर 2009 मध्ये ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले. 2013 मध्ये उपाध्यक्ष झाले. तर 2014मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले.

फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद

2014मध्ये त्यांची देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागली. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्याकडे सहकार, विपणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. जुलै 2016 मध्ये चंद्रकांत पाटलांनी महसूल मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 16 जुलै 2019 रोजी चंद्रकांतदादांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

अमित शहांशी जवळीक

चंद्रकांत पाटील यांना राजकारणात कोणतेही अडथळे आले नाहीत. त्यामागे त्यांची भाजपचे नेते अमित शहा यांच्याशी असलेली जवळीकही सांगितलं जातं. (chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

संघटनात्मक बांधणीत हातखंडा

चंद्रकांतदादा हे उत्तम संघटक आहेत. संघटनात्मक बांधणीत त्यांचा हातखंडा आहे. अगदी बुथ लेव्हलपासूनच्या कामावर त्यांचं लक्ष असतं. संघटनात्मक बांधणीवर पकड असल्यानेच त्याचा त्यांना प्रदेशाध्यक्ष झाल्यावर फायदा झाला. तसेच कोणत्याही प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्यातही त्यांचा मोठा हातखंडा आहे. प्रश्नांच्या मुळाशी जाण्यावर त्यांचा भर असतो, त्यामुळेच ते अनेक जटील प्रश्न चुटकीसरशी सोडवत असतात. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानही त्यांनी यशस्वी तोडगा काढला होता. (chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

संबंधित बातम्या:

आईची मृत्यूशी झुंज, तरीही कोरोना काळात जनतेसाठी रस्त्यावर; जाणून घ्या, राजेश टोपेंविषयी!

‘सुपारी बाग’ व ‘बाकडा कंपनी’ला ‘अडकित्ता बाग’चा पर्याय; कसं आहे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनाचं राजकारण!

वयाच्या 13व्या वर्षी संघात, आणीबाणीत भूमिगत नेत्यांना मदत; हरिभाऊ बागडेंची दमदार इनिंग!

(chandrakant patil: His amazing journey from chawl to cabinet minister)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.