सुपातले जात्यात जातायत, आधीच्याच पीठ झालं, सगळे चक्की पिसणार आहेत- चंद्रकांत पाटील

सुपातले जात्यात जात आहेत, आधीच्याच पीठ झालंय आणि सगळे शेवटी चक्की पिसणार आहेत, असं म्हणत चंद्रकात पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी मविआ सरकावर हल्लाबोल केलाय.

सुपातले जात्यात जातायत, आधीच्याच पीठ झालं, सगळे चक्की पिसणार आहेत- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांचा मविआवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 1:42 PM

मुंबई : सुपातले जात्यात जात आहेत, आधीच्याच पीठ झालंय आणि सगळे शेवटी चक्की पिसणार आहेत, असं म्हणत चंद्रकात पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी मविआ सरकावर हल्लाबोल केलाय. अनिल देशमुखांचं उदाहरण देत त्यांनी सरकारमधील व्यवस्थेवरच सवाल उपस्थित केले आहेत. हे तोडपाणी करणारं सरकार आहे का? गृहमंत्री जेलमध्ये आहे, चाललंय काय, सिताराम कुंटे यांनी आरोप केला आहे, अनिल देशमुख मला चिठ्ठी पाठवयचे, आता देशमुख म्हणतात, अशी चिठ्ठी अनिल परब (Anil Parab) पाठवायचे. ‘बदल्यांमध्ये मविआचा हात पकडू शकत नाही’, हे आम्ही नाही अनिल देशमुख म्हणतातहेत, असाही टोला चंद्रकात पाटील यांनी केलाय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदमध्ये ते बोलत होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध चंद्रकात पाटील अशी जुगलबंदी सुरु असल्याचं बोललं जातंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारवर जोरदार टीका केली आहे.

केंद्राकडून एजेन्सीचा दुरुपयोग, तर मविआकडून पोलिसांचा?

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय, की अनिल देशमुखांना वाटलं की लगेच जामीन मिळेल, पण तसं झालं नाही, ठाकरे कुटुंबियांवरही आरोप झाले, पण इतकी वाईट परिस्थिती स्थिती आली नाही की किरीट सोमय्यांवर हल्ला करावा! केंद्राची सिक्युरीटी असताना, सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. रोज उठून प्रेसला धमक्या, आम्ही दादा आहोत, मुंबई आमची आहे, असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना पाटील यांनी सुनावलंय. नवाब मलिकांच्या जावयांपासून ते शाहरुख खानपर्यंत अशी प्रकरणं बरीच झाली ना? पण तिथं पोलिस, कोर्टाचा सहारा घेतला. पण किरीट सोमय्यांना थेट जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. आता तुम्हालाही असं वाटत असेल, तर सोमय्या, फडणवीस, पाटील एजन्सीचा दुरुपयोग करतायत तर तुम्हालाही कोर्टात जायचा अधिकार आहे, असं चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. पुढे त्यांनी म्हटलंय की,

हे तोडीचं सरकार आहे का? गृहमंत्री जेलमध्ये आहे, चाललंय काय? सिताराम कुंटे यांनी आरोप केलाय की, अनिल देशमुख मला चिठ्ठी पाठवयचे..आता देशमुख म्हणतात, अशी चिठ्ठी अनिल परब मला पाठवायचे. बदल्यांमध्ये मविआचा हात पकडू शकत नाही. हे आम्ही म्हणतोय का? असं तर अनिल देशमुख म्हणतायत.

राजकीय जुगलबंदी!

बिचाऱ्या किरीट सोमय्यांवर इतका राजकीय सूड उगवला गेला की, त्याची कल्पनाही करवत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. पुढे त्यांनी म्हटलंय की

हे फार झालं आता, आता किरीट सोमय्यांवरचा हल्ला सहजासहजी घेणार नाही. अमित भाईंना पत्र लिहलंय, पोलिसांना तकलादू कलमं लावली, पुणे मनपाची सिक्युरिटी काय झोपा काढत होती का? किरीट सोमय्यांवर हल्ला कसा झाला? केंद्रीय सिक्युरिटीशी धक्काबुक्की झाली? महाराष्ट्राचं बंगाल होणार, तिथं शेकडो लोकं मारली गेली, पण आम्ही घाबरणार नाही.

संजय राऊतांनी महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर म्हणण्यावरुन तीव्र शब्दांत आज पत्रकार परिषदेत टीका केली होती. महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेतं नव्हती पडली असं म्हणत गंगेतील धक्कादायक वास्तवावर संजय राऊत यांनी बोट ठेवलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, आता कोविडवर हे बोलतात..पण मोदींनी लस दिली. पीपीई कीट दिल्या. त्यावेळी हे बिळात लपून बसले होते. गंगेतल्या प्रेतांचं बोलता, पण नगरमध्ये एकाच सरणारवर 24-24 प्रेतं जाळली गेली, त्याची चौकशी होते की नाही? एका रुग्णवाहिकेत 20 डेडबॉडी नेल्या, त्याचं काय करायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जगातल्या 60 देशांमध्ये जितकं इन्फेक्शन होतं, तेवढं इन्फेक्शन महाराष्ट्रात होतं, त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी झाली, असं म्हणत त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.

पाहा व्हिडीओ –

वाईनवरुन चाकणकरांना टोला

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. त्यावरुनही चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतलाय. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, चाकणकर सुसंस्कृत घराण्यातल्या आहेत, असं त्या बोलतात, त्यांच्या घरात जाऊन विचारायला हवं, की खरंत त्यांच्या घरातल्यांनाही त्यांची ही भूमिका मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पक्षासाठी सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या रुपाली चाकणकर असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.