मराठा आरक्षण हे कॉंग्रेसच्या काही नेत्यांना कमीपणा वाटते, सरकार गंभीर नाही : चंद्रकांत पाटील
मराठा समाजाला सरकारने योग्य ती मदत करावी, यासाठी आम्ही आंदोलन करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई : कॉंग्रेसच्या काही नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil on Supreme Court stay on Maratha Reservation)
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, वकिलांमध्ये समन्वय नव्हता. कॉंग्रेसच्या काही नेत्यांना हे आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षण म्हणजे कमीपणा वाटत होता, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.
मराठा मोर्चांना खतपाणी घालणे हे आमचे कल्चर नाही. समाजात अस्वस्थता निर्माण व्हावी ही आमची इच्छा अजिबात नाही, मात्र ज्यांच्या मुलांना आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही, ज्यांच्या नोकऱ्या अगदी मिळता-मिळता राहिल्या, त्यांच्यात आपसूकच अस्वस्थता निर्माण होईल. आता मराठा समाजाला सरकारने योग्य ती मदत करावी, यासाठी आम्ही आंदोलन करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
फडणवीस म्हणतात स्थगिती धक्कादायक
दरम्यान, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती धक्कादायक आहे, असे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्थगिती दिली, आता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्थगिती उठवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात आम्ही काटेकोर नियोजन करुन निर्णय घेतले, आता राज्य सरकारनेही योग्य नियोजन करुन तातडीने घटनापीठाकडे धाव घेणे आवश्यक आहे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Chandrakant Patil on Supreme Court stay on Maratha Reservation)
MIDC जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ, देवेंद्र फडणवीसांचा पलटवारhttps://t.co/ZyzIvMraZl
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2020
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? आता काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा : चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil on Supreme Court stay on Maratha Reservation)