AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांना हवंय देवेंद्र फडणवीसांचं पद? थेट म्हणाले, सर्व मंत्रिपदं भूषवली आता फक्त…

भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्रिशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

चंद्रकांत पाटलांना हवंय देवेंद्र फडणवीसांचं पद? थेट म्हणाले, सर्व मंत्रिपदं भूषवली आता फक्त...
chandrakant patil and devendra fadnavis
| Updated on: Apr 22, 2025 | 3:32 PM
Share

Chandrakant Patil : भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्रिशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात माझं फक्त गृहखातंच राहिलं आहे. बाकी सगळी खाती माझी झाली, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

तासगावमध्ये बोलत होते चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील तासगावमध्ये शिवेनारी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. या सांस्कृतिक मंडळातर्फे दुर्गामाता मंदीर उभारण्यात आले आहे. याच मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्रिपदावर भाष्य केलं. तसेच महिलांच्या आजाराच्यासंदर्भात एक मोफत रुग्णालय उभारलं जाईल, असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील भाषण करत होते. भाषणादरम्यान त्यांनी महिलांच्या सर्व आजारांवर मोफत उपचार करणारे एक रुग्णालय उभारले जाईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. तसेच जिजामातांच्या नावाने महिलांच्या आजारासंबंधीचे एक क्लिनिक उभारले जाईल. यात रक्ततपासणी मोफत, इंजेक्शन मोफत, औषधं, प्रसूती, शस्त्रक्रिया असं सगळं मोफत केलं जाईल, असेही चंद्रकांत पटालांनी सांगितलं.

महाराष्ट्रात फक्त गृहखातं राहिलं बाकी…

तसेच पुढे बोलताना ही काही सरकारी योजना नाही. सरकारी योजना वेगळ्या आहेत. मी मंत्री आहे. एक वरिष्ठ मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखातं राहिलं, बाकी सर्व खाती झाली, असे भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

मी माझ्या खिशात हात घालणार की नाही?

मी मंत्री आहे, तरीही माझी अशी धारणा आहे की, आयजीच्या जीवावर बायजी उधार असं कशाला हवं. सरकारच्या योजना मी कशाला चालवायच्या. सरकार त्या योजना चालवेल. पण मग मी काय करणार? मी माझ्या खिशात हात घालणार की नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच सध्या एकच योजना सांगितली. महिलांनी एकत्र येऊन नव्या-नव्या गोष्टी समोर आणाव्यात, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केली.

आपली तरुणाई जपली नाही तर…

“महिलांना उपयोगी पडणारे उपक्रम मंडळाने करावेत. व्यसनी तरुणाला तुमच्या मंडळाचे सदस्य ठेवू नका. तंबाखू खाणाऱ्यालाही घेऊ नका. काही देशातील तरूण पिढी उद्ध्वस्त झाली. त्या देशांची लोकसंख्या कमी होतेय. तो देश चालवायला भारतीय तरुणं लागतात. जर्मनीने महाराष्ट्राला चार लाख पोरं मागितली आहेत. आपण 10 हजार तरुण पाठवले आहेत. बाकीची पाठवली आहेत. आगामी काळात आपली तरुणाई जपली नाही, तर अशीच स्थिती होईल,” अशी भीती चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

नेमकी चर्चा काय रंगली?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्री पदाबाबत असणारी अपेक्षा आपोआप बोलून दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.