नाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत, मनधरणी सुरू आहे : चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil on Eknath Khadse Join NCP)

नाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत, मनधरणी सुरू आहे : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 1:50 PM

पुणे : भाजपचे ज्येष्ठ पण नाराज असलेले नेते नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. पण या सर्व शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळल्या आहेत. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मनधरणी सुरु आहे,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. (Chandrakant Patil on Eknath Khadse Join NCP)

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा सक्रिय होतील. त्यामुळे इतरांचा हिरमोड होईल,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं,” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड’

‘”राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे. पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागत आहे. सरकार एकत्रं चालवायचं आहे म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांची भलामण करावी लागत आहे. याचं वाईट वाटतं. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ते गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते शेतकऱ्यांना भेटत आहेत,” असं ते म्हणाले. (Chandrakant Patil on Eknath Khadse Join NCP)

संबंधित बातम्या : 

बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड; असं पवारांना म्हणायचं असेल: पाटील

दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.