चंद्रपूरच्या अपक्ष आमदाराचा यू-टर्न
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur mla kishor jorgevar support mahavikasaaghadi) यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपला अर्थात महायुतीला पाठिंबा दिला होता.
चंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur mla kishor jorgevar support mahavikasaaghadi) यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपला अर्थात महायुतीला पाठिंबा दिला होता. पण राज्यात गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीनंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर जोरगेवार यांनी यू-टर्न घेत थेट विधानसभेत महाविकासआघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chandrapur mla kishor jorgevar support mahavikasaaghadi) मदत करणार असल्याने त्यांना पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले.
“चंद्रपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार आहेत. तसेच चंद्रपूरचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी महाविकासआघाडीला पाठिंबा दिला. येत्या काळात शेतजमीन पट्ट्यांचा प्रश्न-प्रदूषण-रोजगार-पेयजल या सर्वच मुद्द्यांवर शिवसेनाप्रणीत सरकार मदत करणार”, असं आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
राज्यात भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले. पहिल्या काही दिवसात भाजप शिवसेनेची सत्ता येईल अशी शक्यता होती. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात मागताच अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.
गेले महिनाभर राज्यात नाट्यमयरित्या घडलेल्या घडामोडीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनाप्रणीत महाविकासआघाडीची सत्ता राज्यात पदारुढ झाली. या महाआघाडीला अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात मतदान केले. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
दरम्यान, राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये सर्वाधिक विक्रमी मताने किशोर जोरगेवार यांचा विजय झाला आहे. किशोर जोरगेवार यांनी भाजपचे नाना शामकुळे यांचा 72 हजार मतांनी पराभव केला. यावरुन स्पष्ट होते की जोरगेवार यांचे चंद्रपुरात वजन आहे.