AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bavankule : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मिशन 200 आणि 45’चा नारा; म्हणाले, जिंकणारच!

लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय.

Chandrashekhar Bavankule : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मिशन 200 आणि 45'चा नारा; म्हणाले, जिंकणारच!
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मिशन 200 आणि 45'चा नारा; म्हणाले, जिंकणारच!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 3:56 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून (Maharashtra BJP President) सस्पेन्स वाढला होता. मात्र आता राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. तसेच पक्षीय समीकरणेही बदलत आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्याकडे देण्यात आलंय आणि प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचं लोकसभा आणि विधानसभेतलं टार्गेटही सांगून टाकलंय. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय. त्यामुळे आता बावनकुळे यांच्या या विधानांने विरोधकांनाही धडकी भरण्याची शक्यता आहे, बावकुळेंची पहिली प्रतक्रिया म्हणजे विरोधकांना इशाराच आहे.

मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांचे आभार

प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे म्हणाले, मी आज मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतनं मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष हा जो नंबर एक पक्ष आमचा आहे, महाराष्ट्रामध्ये अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

विधानसबेत दोनशे जागा जिंकण्याचं टार्गेट

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये नंबर एक पक्ष म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड ताकतीने उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. गावाच्या अध्यक्ष पासून ते महाराष्ट्र अध्यक्षांपर्यंत माझ्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास मी पूर्ण करीन, तसेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकसभेमध्ये 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात दोनशे विधानसभा निवडून आणेल, अशी प्रतिक्रिया यावेळी बावनकुळेंनी दिलीय.

आशिष शेलर भाजप मुंबई अध्यक्ष

तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या गळ्यात मुंबईच्या प्रदेशाध्यपदाची धुरा देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. गेल्या काही दिवसात मुंबईच्या अनेक भागात पोलखोल यात्रेच्या माध्यमातून शेलार हे शिवसेनेला वारंवार धारेवर धरत आहेत. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. तर जातीय समीकरण आणि इतर बाबी लक्षात घेऊन बावनकुळेंकडे राज्याची धुरा सोपवण्यात आलीय.

ही बातमी वाचा:

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.