“मोदींच्या नेतृत्वात देशात 400 अन् महाराष्ट्रात 45 जागा जिंकणार”, बारामती दौऱ्यानंतर बावनकुळेंचा आत्मविश्वास वाढला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीविषयी महत्वाचं विधान केलं आहे.

मोदींच्या नेतृत्वात देशात 400 अन् महाराष्ट्रात 45 जागा जिंकणार, बारामती दौऱ्यानंतर बावनकुळेंचा आत्मविश्वास वाढला
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 2:17 PM

बारामती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीविषयी (Loksabha Election2024) महत्वाचं विधान केलं आहे. 2024 ची निवडणूकही भाजप एकहाती जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. तर महाराष्ट्रात 45 जागा आमच्याकडे असतील, असा आत्मविश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

बारामतीचाही गड उध्वस्त करणार!

देशात अनेकजण निवडणुका 40-40 वर्षे जिंकले. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार!, असा निर्धार बावनकुळेंनी बोलून दाखवला.

आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

हे सुद्धा वाचा

आम्हाला संघटन मजबूत करायचंय. विकासकामे पुढे न्यायचीत. जनतेला आतापर्यंत जे मिळालं नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. चांगल्या लोकांना पक्षात आणायचंय. संघटना मजबूत करुन 2014 ची लढाई करायचीय, असं बावनकुळे म्हणालेत.

सध्या बारामतीत फिरतोय. लोकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळतोय. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढतेय. पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघात दौरे करणार आहे. 18 महिन्यांसाठी निर्मला सितारमण यांची बारामती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे अनेक दौरे होतील. संघटन, गरीब कल्याणाच्या योजना पोहोचवणे यावर भर असेल, असं बावनकुळे म्हणालेत.

भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. येत्या काळात अनेकांचे प्रवेश होणार आहेत. मोदींवर देशाचा, बारामतीकरांचा विश्वास आहे. 2024 च्या निवडणुकीत देश त्यांच्यामागे उभा राहिल, असंही ते म्हणाले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.