मुख्यमंत्र्यांनी सकाळी उठून केवळ जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठी संजय राऊतांची नेमणूक केली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात भारनियमन होणार नाही एव्हढी क्षमता तिन्ही कंपन्यांमध्ये आहे. त्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि योग्य नियोजनाची गरज आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये केंद्र सरकारच्या कंपन्या 22 दिवसांचा कोळसा द्यायला तयार होत्या.ऊर्जा मंत्री आणि वित्तमंत्र्याच्या भांडणात नियोजन करता आले नाही. फडणवीस सरकारमध्ये विजेच्या बाबतीत योग्य नियोजन केल गेलं.

मुख्यमंत्र्यांनी सकाळी उठून केवळ जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठी संजय राऊतांची नेमणूक केली आहे - चंद्रशेखर बावनकुळे
आमच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होतेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:07 PM

मुंबई – चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज सहपरिवार साई दर्शनासाठी दरबारी हजेरी लावली.दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी विजेबाबत राज्य सरकार (State Government) नियोजन शुन्य असल्याच म्हणटल आहे. तसेच राज्यात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती थांबवता येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. विरोधकांना आपलसं करून राज्य पुढे नेणे ही संस्कृती जपली पाहीजे. राज्य सरकारला सद्बुद्धी येवो अशी साईबाबा (Saibaba) चरणी प्रार्थना केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना सांगितलं

आमच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते

राज्यात भारनियमन होणार नाही एव्हढी क्षमता तिन्ही कंपन्यांमध्ये आहे. त्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि योग्य नियोजनाची गरज आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये केंद्र सरकारच्या कंपन्या 22 दिवसांचा कोळसा द्यायला तयार होत्या.ऊर्जा मंत्री आणि वित्तमंत्र्याच्या भांडणात नियोजन करता आले नाही. फडणवीस सरकारमध्ये विजेच्या बाबतीत योग्य नियोजन केल गेलं. आमच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते. 45 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांची वीज दिली. आता राज्याची परिस्थिती चांगली असताना राज्य अंधारात का गेले ? याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असून लोकांची अवस्था सहन करण्याच्या पलीकडे झाली तर शेतकरी हैराण झाल्याचे बावनकुळेंनी माध्यमांना सांगितले.

राज्य सरकार चालवणाऱ्या लोकांनी संयम ठेवून सरकार चालवावे

राज्य सरकार चालवणाऱ्या लोकांनी संयम ठेवून सरकार चालवावे. एकीकडे मिटकरी काहीही बोलतात दुसरीकडे राणांनी फक्त एव्हढेच म्हणटले की मला हनुमान चालीसा म्हणायची आहे. मला कोणी असे म्हणाले असते तर मी त्याची टाळ मृदुंग, जेवणाची देखील व्यवस्था केली असती. फडणवीस सरकारच्या काळात कधीही असे वातावरण निर्माण झाले नाही. भावना व्यक्त केल्या तर भावनेचा आदर सरकारने करायचा असतो मात्र आता राज्याच्या संस्कृतीला छेद बसला असून केवळ व्यक्तिगत राजकारण सुरू असल्याची‌ टिका आ.बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

राज्यातील वातावरण चांगले होण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा

राणांपेक्षाही वाईट मिटकरी बोलले.ब्राम्हण समाजावर अत्याचार करणारे वक्तव्य त्यांनी केले. मंत्र्यांसमोरच समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात सामाजिक अन् धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार विरोधात कुणी बोलले तर त्याला वेगळ्या पद्धतीने वागवायचे. राज्यातील वातावरण चांगले होण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा असा सल्ला ही बावनकुळे यांनी दिला.

राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे

आम्ही कधीही राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही. मात्र राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. दोन जिल्ह्यात गोळीबार, यांच्याच मंत्र्याला धमकी, शरद पवारांच्या घरावर लोकं जातात. राणा, सोमय्या, कंबोज यांचे प्रकरण सोडले तरी प्रत्येक जिल्ह्यात अत्याचार सुरू आहे. पोलिसांकडून वसुली सुरू, दारू मटका सुरू, रेती चोरी सुरू, खून होत आहेत, खुलेआम गोळीबार सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार नको ही 70 टक्के जनतेची भावना असुन राज्याचे मंत्री, पालकमंत्री फक्त आपल्या मतदार संघापुरते मर्यादित असल्याने राज्याचा विकास थांबला असल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी डीवचण्याचे काम करू नये ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.

सोमय्या यांच्या गाडीवर मारलेला दगड आणि राणांवर फेकलेल्या बोटल्स सीसीटीव्हीत दिसत आहेत. एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये कसे वागवत आहेत हे दिसतंय. मग असे बोलून संजय राऊत कशाला वातावरण खराब करत आहेत. संजय राऊत यांनी डीवचण्याचे काम करू नये ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. पण कधीही ते विकासावर बोलत नाहीत. मुख्यमंत्री बारा कोटी जनतेसाठी काय चांगले काम करतात याची मांडणी त्यांनी करावी मात्र सकाळी उठुन केवळ जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठी संजय राऊतांना नेमले आहे. सकाळची प्रेस महाराष्ट्राच्या विकासावर व्हावी अशी संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांना विनंती असल्याचे बावनकुळे म्हणाले.

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.