“संजय राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय, कार्यकर्त्यांवर नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा”

वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी इथं जे ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केलं ते लाज आणणारं आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. | ChandraShekhar Bawankule

संजय राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय, कार्यकर्त्यांवर नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 1:03 PM

नागपूर : “वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी इथं जे ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केलं ते लाज आणणारं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावून लावत गर्दी जमवली. अशी गर्दी जमवून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय. मुख्यमंत्री महोदय कार्यकर्त्यांवर नाही तर राठोडांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या”, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (ChandraShekhar Bawankule Criticized Sanjay Rathod over pohradevi Gathering)

“राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती असताना एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत तर त्यांचेच एक मंत्री हजारोंची गर्दी जमवत आहेत. राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपमान केलाय”, असं बावनकुळे म्हणाले. तर कोरोना संकटात देखील मंत्री संजय राठोड यांनी काल शक्ती प्रदर्शन केलं, यावर मुख्यमंत्री गप्प का?, असा सवालही त्यांनी विचारला.

फक्त कार्यकर्त्यांवर नाही तर राठोडांवर गुन्हा दाखल करावा

कोरोनाच्या ऐन संकटात पोहरादेवी इथे हजारो लोकं एकत्र आले. कोरोनाच्या काळात अशी गर्दी करण्याला मनाई असताना देखील शासन प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यां गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र केवळ लोकांवर नाही तर राठोडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

नैतिकता नसल्याने शक्तीप्रदर्शन

एकतर आरोप झाल्यानंतर राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता. परंतु राजीनामा दिला नाही. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी 15 दिवस लपून बसले आणि बाहेर निघाले तर हजारोंची गर्दी जमवली. राठोड यांच्याकडे नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी.

नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे राठोड रवाना

संजय राठोड हे नागपूरवरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra cabinet meeting) आज बैठक होत आहे. या बैठकीला ते प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan suicide case) संजय राठोड हे नॉट रिचेबल होते.

दरम्यान, नागपूर विमानतळावर संजय राठोड यांना माध्यमांनी गाठलं. आजच्या बैठकीला हजर राहणार का असा प्रश्न संजय राठोड यांना विचारण्यात आला. त्यावेळी संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. “दोन तासांपूर्वीच मी माझी प्रतिक्रिया दिली आहे. तासा-तासाला प्रतिक्रिया काय द्यायची?” असा प्रश्न संजय राठोड यांनी विचारला.

(ChandraShekhar Bawankule Criticized Sanjay Rathod over pohradevi Gathering)

हे ही वाचा :

मंत्रिमंडळ बैठकीला जाणार का?, संजय राठोड म्हणाले, तासा-तासाला प्रतिक्रिया काय द्यायची

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.