AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे.

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:39 PM

मुंबई : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommoi) यांनी या घटनेवर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरातील शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केलीय.

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

‘आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

इतर बातम्या : 

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.