शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतात? छगन भुजबळ यांनी सांगितलं…
शरद पवार यांना जानता राजा का म्हणतात? याचं उत्तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलंय... काय म्हणालेत पाहा...
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणतात. शरद पवार (Sharad Pawar) यांना ही उपाधी का देण्यात आली आहे? यावर अनेकदा चर्चा होते. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ का म्हणतात, याबाबतचं स्पष्टीकरण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलंय.
जाणता राजा म्हणजे काय? तर लोकांचे प्रश्न समजून घेऊन जो हे प्रश्न सोडवतो. जनतेशी एकरूप होतो त्याला जाणता राजा म्हणतात. शरद पवार यांचं काम मी पाहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवार यांना जर जानता राजा म्हटलं जात असेल तर त्यात चूक काय आहे?, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे.
शरद पवार यांना देण्यात आलेली ही पदवी मला मान्य आहे. मी शरद पवारांसोबत फिरलो आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं. महिलांचे प्रश्न सोडवले. त्यांना आरक्षण दिलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे ? आम्ही म्हणतो. तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू, असं भुजबळ म्हणालेत.
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ बोललेत. आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात. मात्र निवडणुकीवेळी एकत्र येतात . ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, याप्रमाणे निवडणुकीवेळी एकत्र येतात. त्यामुळे आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही. ते महाविकास आघाडीचा भाग झाल्यास आनंदच आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.