मला निकालाचं टेन्शन नाही, बिरयानी खायला हैद्राबादला चाललोय; निकालाआधी अब्दुल सत्तार यांना कॉन्फिडन्स

Abdul Sattar on SC on cm eknath shinde disqualification case : राज्यातील सत्तासंघर्षाचा आज 'सर्वोच्च' निकाल; अब्दुल सत्तार यांची सविस्तर प्रतिक्रिया

मला निकालाचं टेन्शन नाही, बिरयानी खायला हैद्राबादला चाललोय; निकालाआधी अब्दुल सत्तार यांना कॉन्फिडन्स
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 11:07 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. 11.40 मिनिटांनी महाराष्ट्रातील राजकीय पेचावर निकाल येणार आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. विजय आमचाच असेल, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.

निकाल आमच्याच बाजून लागणार आहे. त्यामुळे मला टेन्शन नाही. मी बिरयानी खायला हैद्राबादला चाललोय, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर यांचा दौरा पूर्वनियोजित होता. त्याचा आणि निकालाचा तसा काही संबंध नाही, असं सत्तार म्हणालेत. शिवाय कार्यकर्त्यांना ऐवढंच सांगेन की निश्चित राहा, असंही ते म्हणालेत.

संजय राऊत ला काय ट्विट करायचे ते करू द्या. त्यांच्या ट्वीटला आता काहीही महत्व नाही. सर्वोच्च न्यायलय जो ही निकाल देईल तो मान्य असेलॉ, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

आम्ही सेनेत होतो तेव्हा आम्ही वाघ होतो आणि पक्ष सोडला की रेडे? रेडे पण आपली भूमिका बजावतात, असं म्हणत सत्तार यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

दरम्यान जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही सत्तार बोललेत. जयंत पाटील हे चांगले नेते आहेत. पण नोटीस मिळाली असेल तर कारवाई व्हायला हवी, असं मत सत्तारांनी व्यक्त केली.

जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर आणि सत्तासंघर्षाच्या निकालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्ष परदेशात, जयंत पाटलांना ED नोटिस यावरून निर्णय या सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता? निर्णय खरच जर आताच्या सरकार विरुद्ध आला, तर मात्र कोर्टाचे निकाल, आधी कसा leak झाला, ह्यावर कोर्टालाच गांभीर्याने विचार करावा लागेल, असं त्या म्हणाल्या आहेत.

निकाल आमच्याच बाजूने लागेल, असं शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आमची बाजू आम्ही भक्कमपणे मांडली आहे. आमच्या अपात्रतेचा प्रश्नच निर्माण येत नाही. कारण 10 वी सूची आम्हाला लागू होत नाही. आम्ही कोणतंही चुकीचं कृत्य केलेलं नाही, असंही शिरसाट म्हणालेत.

तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. शिवाय समाजासाठी आम्ही जे काम केलं आहे. लोक समाधानी तर आम्ही समाधानी आहेत. आज निर्णय लागला की सरकार कोसळणार असं काही नाही. विरोधक त्याची भूमिका ते पार पाडतात. मी टी व्ही बघत नाही. मी माझ्या मतदार संघात फिरलो आणि रात्र भर निवांत झोपलो. शिवाय माझ्या वाट्याला जय पराजय हा आहेच. तो मी मान्य करतो. माझे ठरलेले कार्यक्रम मी पार पाडत आहे. निकाल जो असेल तो मान्य करू आणि पुन्हा लोकांच्या दारात जाईल, असं अनिल बाबर म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.