संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख भाजपवर, राष्ट्रवादीवर नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण

Ambadas Danve on Saamana Editorial : शरद पवार यांचा राजीनामा, सामनाचा अग्रलेख अन् चर्चा; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण

संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख भाजपवर, राष्ट्रवादीवर नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 1:41 PM

छत्रपती संभाजीनगर : पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनीही अग्रलेखावर प्रतिक्रिया दिला आहे. या अग्रलेखावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले…

संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख हा भारतीय जनता पार्टीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती लिहिलेला नाही. सामना हे वृत्तपत्र आहे. त्यात काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हा अधिकार संपादकांचा आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

पाठीमागे संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का? असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळेला छगन भुजबळ का नाही बोलले? महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. संजय राऊत आणि राष्ट्रवादी अशी कोणतीही धुसफूस सुरू नाहीये. संजय राऊत इतकंच म्हणाले होते की, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, अत्यंत सकारात्मकपणे संजय राऊत शरद पवारांबद्दल आपली मतं मांडतात, असंही दानवे म्हणालेत.

सामनावर शरद पवार काय म्हणाले?

सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यावर यावर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवार म्हणालेत.

आजच्या सामनात नेमकं काय?

भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण?, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलंय.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.