दुसऱ्यांचे वाभाडे काढून सुषमा अंधारे यांनी लोकप्रियता वाढवली; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात

Sanjay Shirsat on Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना नेत्याचं टीकास्त्र; म्हणाले त्यांची लोकप्रियता...

दुसऱ्यांचे वाभाडे काढून सुषमा अंधारे यांनी लोकप्रियता वाढवली; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:00 PM

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला पोहोचायला उशीर होतो कारण ते प्रत्येक सामान्य माणसाला भेटतात, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुकही केलंय.

सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. त्यामुळे अंधारे यांनी गौतमीला सपोर्ट केला. इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून तिला वाईट आहे, असे मी म्हणणार नाही. ती तिच्या पोटासाठी खूप महत्त्वाचं काम करत आहे. कुणाच्या तळतळात घेऊन वाभाडे काढून नाव ठेवून सुषमा अंधारे यांनी तिची लोकप्रियता जपली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

सामना अग्रलेखावर प्रतिक्रिया

आजच्या सामनातून नव्या संसदेच्या उद्घाटनावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘दिल्लीत युद्धाचा प्रसंद, नव्या संसदेचे नवे मालक’ या शीर्षकाखाली आजचा सामानाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यालाही संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊतला कोणतं युद्ध दिसत आहे ते मला माहित नाही. देशावर युद्धाचं सावट नाही. संजय राऊतला अंतर्गत युद्ध करायचा असेल. संजय राऊतसारख्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही फरक पडत नाही, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे गटाला आता कोणत्याही काम शिल्लक राहिलेलं नाही इतर पक्षाची झेंडे घेऊन फिरणं, अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. संजय राऊत यांनी सामनाचे आणि पक्षाचे दुकान बंद केले आहे. त्यामुळे ते दुसरं दुकान काढण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटात संजय राऊत यांचा रोल प्रेम चोप्रासारखा व्हिलनचा आहे, असं ते म्हणालेत.

नव्या संसद भवनाचं उद्घाटन; शिरसाट म्हणाले…

नव्या संसदेचं उदघाटन देशासाठी गौरवाची गोष्ट आहे. आघाडीच्या वेळेस निमंत्रण येत नव्हतं. संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण आलं नाही, म्हणून रुसवे फुगवे धरून चालणार नाही. कारण त्याच संसदेत बसून काम करायचं आहे. प्रत्येक उद्घाटनाला राष्ट्रपतीच जातात, असं होत नाही. त्यांच्यामागे दुसरेही काही कार्यक्रम असतात. कुणाला बोलवलं नाही म्हणजे हा वादाचा मुद्दा होत नाही. कार्यक्रमाला गालबोट लावायची आणि टीका करायची. एवढंच सध्या विरोधकांच काम आहे, असं म्हणत शिरसाट यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.