‘अशी’ विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? उदयनराजे कडाडले…

उदयनराजे भोंसले यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

'अशी' विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? उदयनराजे कडाडले...
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 1:04 PM

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला. त्यावर उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

राज्यपालांनी ज्यावेळी हे वकव्य केले त्यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि नितीन गडकरी होते, का नाही त्यांनी यावर बोललेत, भाषणात बोलायला पाहिजे होतं, असं उदयनराजे म्हणालेत.

या देशाला जर महासत्ता बनवायची असेल तर शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत. या वक्तव्याचा राग आज सामान्य लोकांना आला आहे. सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट व्यवस्थीत सेन्सर होत नाही, कुठे गेले तुमचे विचार…, असं म्हणत सिनेमातून दाखवल्या जाणाऱ्या इतिहासावर भाष्य केलंय.

सर्वधर्म जातीच्या लोकांना एक ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, नाहीतर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे कुटुंब मानले नाही तर देशाला त्यांनी कुटुंब मानलं आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी।नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही. मी म्हणजे समाज असं ते मानायचे. मात्र आता सगळ्या गोष्टी व्यक्ती केंद्रित झाल्या आहेत, असं उदयनराजे म्हणालेत.

शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान आहेत.त्यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कुणी काहीही बोललं तर खपवून घेणार आहे, असं उदयनराजे म्हणालेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.