उद्धव ठाकरेंना झटका! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मारले मैदान

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास कुणाला परवानगी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच शिंदे गटाने मैदान मारले आहे.

उद्धव ठाकरेंना झटका! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मारले मैदान
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:58 PM

मुंबई :  दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात सुरु असलेल्या लढाईत मोठा ट्विस्ट आला आहे. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास कुणाला परवानगी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच शिंदे गटाने मैदान मारले आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. त्यातच ऑप्शन म्हणून शिंदे गटाने शिंदे गटाने ‘एमएमआरडीए’कडे बीकेसी मैदानावर साठी अर्ज केला होता. शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. यामुळे गरज पडल्यास बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केलाय. मात्र, हे मैदान आरक्षित असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती सुंत्रांकडून मिळाली आहे.

शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दसरा मेळाव्यावरुन घमासान सुरु आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो.

कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

मात्र, मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे हा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

शिवाजी पार्कचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे शिंदे गटाला दसरा मेळावा दुसरीकडे घ्यावयचा झाल्यास बीकेसे मैदान हे पर्यायी जागा ठरणार आहे .

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.