Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैठणच्या सभेत मुख्यमंत्र्यांचे चॅलेंज, विधानसभा निवडणुकीत आमच्या एवढ्या जागा येणार

सध्या राज्यात भाजपा युतीचे आमदार आज 160 च्या वर आमदारा आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या आमदारांचा आकडा 200 च्या वर जाईल ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे  असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पैठणच्या सभेत मुख्यमंत्र्यांचे चॅलेंज, विधानसभा निवडणुकीत आमच्या एवढ्या जागा येणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 7:15 PM

औरंगाबाद : औरंगाबाद मधील पैठण येथील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी थेट निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे 200 आमदार निवडून येतील ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांना चॅलेंज केले आहे.

सध्या राज्यात भाजपा युतीचे आमदार आज 160 च्या वर आमदारा आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या आमदारांचा आकडा 200 च्या वर जाईल ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे  असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीत सगळा गोंधळ होता. सगळ रिमोट कंट्रोल आमच्या 50 लोकांनी आणि भारतीय जनता पक्षाचे 106 लोकांनी काढून घेतल्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालेला आहे.

हा सर्व सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस; मुख्यमंत्री होणार का? कायम काय अग्रीमेंट केलेलं आहे का? असे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मी मुख्यमंत्री झालो म्हणून त्यांना पोटदुखी होत आहे. मी फिरणार आणि लोकांना भेटणार. तुम्ही कितीही टीका करा आम्ही कामाने उत्तर देणार. विरोधक औषधालाही सापडणार नाही असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

लोक विरोधातून सत्तेकडे जातात परंतु आम्ही सत्तेतून पाय उतार झालो आणि आम्ही विरोधाकडे गेलो. माझ्याबरोबर आठ नऊ मंत्री होते. 40 आमदार होते. एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच नगरसेवक देखील एखादा असा निर्णय घ्यायला फार विचार करतो इकडे 50 आमदारांनी एकत्रित निर्णय घेतला. हा देशात नाही तर जगातला एक मोठा इतिहास असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.