Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे थेट जनतेशी बोलणार, 5 वा. लॉग ऑन करा tv9 मराठी
शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) थेट जनतेशी बोलणार आहेत. ते पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे ही एखादी मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची जे विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) पत्र लिहिलं आहे. त्या पत्रावर 34 शिवसेना आमदारांच्या सह्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहाजिकच उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांची सख्या ही अल्पशी उरलेली. सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमत्री उद्धव ठाकरे हे राजीनाम्याची घोषणा करणार का? असाही एक सवाल सध्या राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ट्विट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 22, 2022
बंडांच्या 72 तासानंतर जनतेला काय बोलणार?
शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड झाल्याच्या 72 तासांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी बोलणार आहेत. या काही तासांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं फोनवरून बोलणं हेही झालं आहे. तसेच अनेक बैठाक पार पडल्या आहे. इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. तर तिकडे भाजप नेते हे सत्ता बदलासाठी सुत्रं फिरवताना दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली
तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची पुढची चाल काय असणार? याचा अंदाजही सध्या तरी कुणाला लागत नाही. भाजपच्या गोटातही सत्ता बदलासाठीच्या हलचाली वेगाने वाढल्या आहेत. चंद्रकांत पाटील हे काही आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढचे काही तास हे राज्याच्या राजकारणात सर्वात महत्वाचे ठरणार आहेत. राज्यात सध्या सत्ता बदलाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. तसेच पुन्हा फडणवीस सरकार येणार असल्याच्या चर्चांनी सध्या रान पेटवलं आहे. मात्र राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जातं हे पाहण्यासाठी पुढचे काही तास वाट पाहावी लागणार आहे.