एकनाथ शिंदे कुणा कुणाला मंत्री बनवणार? आता आणखी एक आमदार म्हणतोय मी पण मंत्रीपदाचा दावेदार

शिंदे गटातील अनके आमदार मंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहेत.

एकनाथ शिंदे कुणा कुणाला मंत्री बनवणार? आता आणखी एक आमदार म्हणतोय मी पण मंत्रीपदाचा दावेदार
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 5:46 PM

मुंबई : दुसरा मंत्री मंडळ विस्तार कधी होणार याची तारीख जाहीर झाली नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. कुणा कुणाला मंत्री बनवायचं? हा विषय सोडवताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाकी नऊ येणार आहेत. कारण येणार शिंदे गटाच्या आणखी एका आमदाराने मी पण मंत्रीपदाचा दावेदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटातील अनके आमदार मंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहेत. शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं दिसत आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री पदासाठी सुरुवातीपासून दावेदार असल्याचा दावा केला आहे. मी तशी विनंती पण केली असल्याचे पाटील म्हणाले.

पारोळा मतदार संघातील चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ते शिंदे गटात सामील झाले. मागील तीन टर्मपासून चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली.

मंत्रीपद न मिळाल्यामुळे चिमणराव पाटील नाराज होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी सर्वप्रथम आमदार चिमणराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या पाठशी उभे राहिले.

सुरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा यानंतर पुन्हा रिटर्न मुंबई.  या दरम्यान चिमणराव पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या बंडखोरीचे समर्थन करणारी भूमिका मांडली.

चिमणराव पाटील हे बंडखोरांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार होते. यामुळे पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात चिमणराव पाटील यांना एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपदाची संधी देतील, अशी अपेक्षा होती.

प्रत्यक्षात मात्र राज्याच्या शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळालेली नाहीय. त्यामुळे चिमणराव पाटील यांचे समर्थक नाराज झाले.

आता चिमणराव पाटील हे चर्चेत आले आहेत ते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सुरु असलेल्या राजकीय वादामुळे. शिवसेनेत असल्यापासून गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटलांमध्ये मतभेद आहेत.

गुलाबराव पाटलांकडून होणाऱ्या कुरघोडीला कंटाळून चिमणराव पाटील ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले, पण आता शिंदे गटात एकत्र असूनही त्यांच्यातला वाद मिटलेला नाहीये. गुलाबरावांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला बळ देऊन आपल्याच सहकारी आमदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केल्यामुळं हा वाद अजून वाढण्याची चिन्हे आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.