“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केलीये. तसेच केंद्र सरकारच्या मदतीवरून खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय.
अहमदनगर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केलीये. तसेच केंद्र सरकारच्या मदतीवरून खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळून गेले. त्यामुळे हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री अशी घणाघाती टीका वाघ यांनी केली. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज (24 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिथे पोहोचले. त्यामुळे त्यांचं अभिनंदन, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. सर्वात आधी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन पाहणी केली. कामांमध्ये लक्ष घालून लोकांना मदत करायला सरकारला भाग पाडलं, असंही मत वाघ यांनी व्यक्त केलं.
“ड्रायव्हिंग स्किल कोकणात दाखवण्याची गरज”
चित्रा वाघ म्हणाल्या, “मुख्यमंत्री मातोश्रीवरून पंढरपूरला ड्रायव्हिंग स्किल दाखवत गेले. ते ड्रायव्हिंग स्किल कोकणात दाखवण्याची गरज होती. कारण लोकं तिथे चातकासारखी सरकारच्या प्रतीक्षेत बसली होती. सरकारची मदत तिथे जाणे अपेक्षित होती मात्र मदत पोहोचली नाही.” यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीवरून खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीये. राज्याचे सर्वज्ञानी जे गुरु आहे ते नेहमी म्हणतात केंद्राने मदत करायला पाहिजे. केंद्र मदत करणारच, पण राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही? असा सवाल त्यांनी राऊत यांना केलाय. राज्य सरकार म्हणून आपले दायित्व आहे ते संजयजी आपल्याला निवभवायला पाहिजे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
“हे कसले पालकमंत्री, हे तर पळकुटे मंत्री”
“रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळून गेलेय. त्यामुळे हे कसले पालकमंत्री, हे तर पळकुटे मंत्री आहे. रत्नागिरीच्या नागरिकांचे प्राण कंठाशी आले असताना त्या ठिकाणी तळ ठोकून बसायला हवं होतं. मात्र, हे पळून आलेले मंत्री आहेत. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे,” असं वाघ म्हणाल्या. “महाविकास आघाडीमध्ये एकी नसून हे रोज स्वार्थासाठी भांडत आहे. दररोज आमचे सरकार पाच वर्षे टिकेल अस सांगताय. मात्र यांना कोणी विचारलं. जर सरकार 5 वर्षे टिकणार आहे, तर दररोज सांगायची गरज नाही,” असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिलाय.
हेही वाचा :
‘..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल
संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील
ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ, मुलीशी अश्लील भाषेत बातचित, पीडितेच्या न्यायासाठी चित्रा वाघ कडाडल्या
व्हिडीओ पाहा :
Chitra Wagh criticize Anil Parab and MVA government over flood help in Maharashtra