“शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात”, ठाकरेंच्या भाषणावर चित्रा वाघ यांची टीका
खासदार श्रीकातं शिंदे यांचा मुलगा रुद्रांशवर उद्धव ठाकरेंवर टीका केल्याने अनेकांनी निषेध केला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर भाष्य केलंय.
मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थवर दसरा मेळावा झाला. तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा झाला. यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लहान मुलावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. दीड वर्ष वय असणाऱ्या रुद्रांशवर टीका केल्याने अनेकांनी त्याचा निषेध केला. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही यावर भाष्य केलंय. “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत ठाकरेंच्या भाषणावर टीका केलीय. पदं वाटताना‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीचं गेलं नव्हतं. ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
“जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद स्विकारण्याची वेळ आली. तेव्हा शिवसैनिक सोडून मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून पक्षाध्यक्षपदही स्वतःकडेच ठेवलं. शिवसैनिक सोडून आपल्या मुलाकडे मंत्रिपद दिलं. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच आपल्या पत्नीकडे संपादकपद दिलं. ते एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका करत आहेत… अशा राजकारणाचा निषेध करावा तितका कमी”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद पदे वाटताना‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात pic.twitter.com/YuBYph0PpR
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 7, 2022
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर श्रीकांत शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिलं. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारलेत.