Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणात नाट्यमय वळण! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; चित्राताई म्हणाल्या, आनंद वाटला…

चित्रा वाघ यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिलीय. 'फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला', असं वाघ यांनी म्हटलंय.

Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणात नाट्यमय वळण! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; चित्राताई म्हणाल्या, आनंद वाटला...
चित्रा वाघ, भाजप नेत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:51 PM

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालंय. या प्रकरणातील पीडित तरुणीने आता थेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केलाय. त्यामुळे या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केलीय. तर चित्रा वाघ यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिलीय. ‘फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला’, असं वाघ यांनी म्हटलंय.

पीडित तरुणीचा नेमका आरोप काय?

मदत म्हणजे त्यांना माझं काही पडलेलं नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे. त्यामुळे त्या माझ्याकडून अगदी तक्रारीपासून सगळ्या गोष्टी म्हणजे रघुनाथ कुचिक यांचा पीआरओ रोहित पिसे म्हणून आहे. तो सगळी माहिती म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची फॅमिली काय? आनंद घरत म्हणून असाही एक व्यक्ती आहे. हे सगळे मिळून त्यांची सगळी माहिती ते अंकल आणि चित्रा वाघ यांना पाठवतात. त्यातून मग पुढील सगळ्या गोष्टी घडत गेल्या, असं पीडित तरुणी म्हणाली. त्यावेळी चित्रा वाघ यांनी तक्रार करण्यासाठी तुझ्यावर दबाव आणला का? असा प्रश्न विचारला असता, चित्रा वाघ म्हणण्यापेक्षा या सगळ्यांनीच माझ्यावर दबाव आणला. जोपर्यंत मी रघुनाथ कुचिक यांच्यासोबत होते, माझी सगळी अबॉर्शन प्रोसेस सुरु होती, तोपर्यंत सगळं ठीक होतं. कारण मी त्यांना विरोध करुन आले होते. त्यानंतर मी प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात नव्हते. पण मला वारंवार फोन करुन परत यायला सांगत होते. त्यांच्याविरोधात तक्रार करायला सांगत होते. हे सगळं ते अंकल सांगत होते आणि त्यांनीच हे सगळं चित्रा वाघ यांना सांगत होते.

इतकंच नाही तर मला गोव्याला घेऊन गेले ते व्यक्ती चित्रा वाघ यांच्या जवळचे होते. चित्रा वाघ यांनी पहिली पत्रकार परिषद मुंबईत घेतली तेव्हा त्याच लोकांनी मला मुंबईतील लिलावती रुग्णालयातजवळच्या हॉटेलमध्ये बळजबरी ठेवलं होतं. माझे मोबाईल काढून घेतले होते. मला तेव्हा थेट पत्रकार परिषदेत समोर आलं. मला तेव्हाही काही बोलायचं नव्हतं. पण तरीही चित्राताई यांनी मला फोर्सफुली बोलायला लावलं.

चित्रा वाघ यांची बाजू काय?

‘रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही. असे ही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहीले, तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे’, असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडत या प्रकरणातील चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं म्हटलंय.

इतर बातम्या :

INS Vikrant Case : ‘किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील’, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा

Kirit somaiya : सोमय्यांना सलग दुसरा मोठा झटका, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.