नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती? चित्रा वाघ यांचा सवाल

'नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासाठी राहुल गांधी यांची सहमती आहे काय? पंजाबमध्ये फेल झालेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? आमचा महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे दिला जावा', अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती? चित्रा वाघ यांचा सवाल
चित्रा वाघ, नाना पटोले
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:08 PM

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. तर मुंबई भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना निवेदन देत कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पटोलेंवर जोरदार टीका करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेस हायकमांडलाच सवाल केलाय.

‘तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या’

‘नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासाठी राहुल गांधी यांची सहमती आहे काय? पंजाबमध्ये फेल झालेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? आमचा महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे दिला जावा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

‘मंत्रीपद मिळत नसल्याचा राग कुठेही काढू नका!’

‘मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो’ म्हणणा-या नानांनी तालिबान्यांचा पक्ष जॅाईन केलाय की काँग्रेस पक्षानंच तालिबानी संघटनेशी युती केलीय.. मोदीजी केवळ भाजपचे नेते नाहीत तर देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत हे विसरू नका. नानाभाऊ, मंत्रीपद मिळत नसल्याचा राग कुठेही काढू नका..! असा टोलाही चित्रा वाघ यांनी काल पटोलेंना लगावला होता.

नाना पटोले यांचं नेमकं वक्तव्य काय?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

इतर बातम्या :

नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा, भाजप शिष्टमंडळांचं राज्यपाल कोश्यारींना निवेदन; कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.