विधानसभेत जोरदार राडा, भाजपच्या कोणत्या आमदारांवर कारवाईची शक्यता?

तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची बैठक सुरु आहे. यात भाजपच्या काही आमदारांच्या निलंबनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेत जोरदार राडा, भाजपच्या कोणत्या आमदारांवर कारवाईची शक्यता?
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 2:32 PM

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची बैठक सुरु आहे. यात भाजपच्या काही आमदारांच्या निलंबनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Choes in the assembly monsoon session, possibility of suspension of BJP MLAs)

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदार उतरले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारनं इम्पेरिकल डाटा द्यावा असा ठराव मांडण्यात आला. त्यावेळी विरोधी आमदारांनी जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली. हा गोंधळ सुरु असतानाच ठराव मांडण्यात आला आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी बहुमताने तो मंजुरही केलाय. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

विधानसभेत नेमकं काय घडलं?

ओबीसी आरक्षणाच्या ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस अध्यक्षांच्या दालनात पोहोचले. तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदारही दालनात उतरले. त्यावेळी विरोधी आमदार आणि भास्कर जाधव यांच्यातही धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. सभागृहाचं कामकाज पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केलीय. दरम्यान, तालिका अध्यक्षांना कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नसल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांचा आरोप फेटाळून लावलाय.

भाजपच्या कोणत्या आमदारांवर कारवाईची शक्यता?

  1. संजय कुटे
  2. आशिष शेलार
  3. गिरीश महाजन
  4. अतुल भातखळकर
  5. नारायण कुचे

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार

स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करतंय… असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

संबंधित बातम्या :

विधानसभेत धक्काबुक्की, तालिका अध्यक्षांचा माईक ओढला; सत्ताधाऱ्यांची कारवाईची मागणी

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा

Choes in the assembly monsoon session, possibility of suspension of BJP MLAs

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.