सोलापुरचे खासदार गप्प का? नागरिक संतापले, 28 गावांच्या नजरा कर्नाटकच्या दिशेने…

लोकप्रतिनिधी आणि धर्मगुरू म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठीही पुढाकार घेतलेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

सोलापुरचे खासदार गप्प का? नागरिक संतापले, 28 गावांच्या नजरा कर्नाटकच्या दिशेने...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 9:43 AM

सोलापूरः सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीत (Grampanchayat) तसा ठराव घेण्यात आला. मात्र सोलापुरचे खासदार यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्या नागरिकांनी मतं दिल्याने मागील 8 वर्षांपासून हे खासदारकी भूषवत आहेत, त्यांच्या प्रश्नावर हे एवढा वेळ गप्प कसे बसू शकतात, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाहीये.

सामाजिक कार्यकर्ते राज सलगर म्हणाले, खासदार महोदय गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही विषयावर बोलायला तयार नाहीत.

माध्यमांनाही बोलत नाहीत. ज्या तालुक्यात त्यांचा जन्म झाला, त्याच तालुक्यातील 28 गावंच कर्नाटकात जायला निघाली आहेत. म्हणजे जन्मभूमी आणि कर्मभूमीलाही तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत.

एकिकडे खासदार म्हणून तुम्ही अपयशी आहात तर दुसरीकडे धर्मगुरू म्हणूनही तुम्ही अपेक्षा पूर्ण करत नाहीयेत, असा आरोप राज सलगर यांनी केला.

सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात धर्मगुरू म्हणून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा मोठा भक्तगण आहे. लिंगायत समाजाचे ते धर्मगुरु आहेत.

पण आपल्या गावातील लोकांची त्यांनी साधी भेटही घेतली नाही. हे खासदार महोदयांचं खूप मोठं अपयश असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चिमणीचा प्रश्न पेटला आहे. लोकप्रतिनिधी आणि धर्मगुरू म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठीही पुढाकार घेतलेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिक बोलायला गेल्यास ते म्हणतात, आम्ही संसदेत बोलतो. पण तिथंही ते गप्प असतात. 420 चा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला असून कोर्टाच्या चकरा मारण्यात त्यांचं आयुष्य चाललंय, अशी टीका नागरिकांनी केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.