Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे उद्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी, शनिवारी अमित शाह यांची भेट घेणार

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने अमित शाह आणि मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक करण्यात आलं होतं.

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे उद्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी, शनिवारी अमित शाह यांची भेट घेणार
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:52 PM

मुंबई : नवे मंत्रिमंडळ आणि खाते वाटप बाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे उद्या दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत. या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात ते परवा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्यासोबत आणि जेपी नड्डांसोबत या भेटीमध्ये खाते वाटंबाबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे या हाय व्होल्टेज भेटीकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने अमित शाह आणि मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक करण्यात आलं होतं. आता उद्या दिल्लीत एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत होण्याची शक्यता आहे.

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत भेटीगाठी

एकनाथ शिंदे हे उद्या सायंकाळीच दिल्लीसाठी निघणार आहेत. मात्र त्यांची पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांची नियोजित भेट ही परवाची आहे. शनिवारी ते पंतप्रधान मोदी, अमित शाह. जे पी नड्डा आणि राजनाथ सिंह यांना भेटणार आहेत. अशीही माहिती समोर आली आहे.

बंडावेळी भाजप नेत्यांची भूमिकाही महत्वाची

एकनाथ शिंदे यांच्या बंडा वेळी भाजपनेही अगदी दिल्लीतून फिल्डिंग लावली होती. अमित शाह, जीपी नड्डा, हे नेते सतत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. त्यांना मार्गदर्शन करत होते. दिल्लीत बसून गुजरात आणि गुवाहाटीतली सूत्र फिरवत होते. आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेत होते. हे सर्व करत असताना एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होण्यात त्याला पावलोपावली भाजपने त्यांनीही तशीच साथ दिली आहे, त्यामुळेच राज्यात शिंदे आणि भाजपचा मिळून एकत्र सरकार स्थापन झाला आहे.

भाजपशासित राज्यातील नेत्यांनीही साथ दिली

बंडखोर आमदारांचा आणि एकनाथ शिंदे यांचा बंडादरम्यानचा सर्व प्रवास हा भाजपशासित राज्यातून राहिला आहे. सुरुवातीला ते सुरतला पोहोचले, त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले. त्यानंतर तिथून आमदारांना गोव्याला नेण्यात आले. या सर्व राज्यात सध्या भाजपची सरकार आहेत. तिथल्या स्थानिक नेत्यांनी ही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी अमित शाह आणि जे.पी नड्डा यांनी एकनाथ शिंदे यांचा कौतुक केलं होतं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.