AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर! कुणाकडे कोणती जबाबदारी, वाचा एका क्लिकवर

शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रंही आज देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर! कुणाकडे कोणती जबाबदारी, वाचा एका क्लिकवर
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 9:30 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेली पण आता पक्षही हातचा जातो का? खरी शिवसेना कुणाची? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशास्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिलाय. शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रंही आज देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.

एकनाथ शिंदेंकडून कुणाला कोणतं पद?

>> किरण पावसकर – शिवसेना सचिव >> संजय मोरे – शिवसेना सचिव >> दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते >> उदय सामंत – प्रवक्ते >> किरण पावसकर – प्रवक्ते >> गुलाबराव पाटील – प्रवक्ते >> शीतल म्हात्रे – प्रवक्ते >> डॉ. बालाजी किणीकर – खजिनदार

खरी शिवसेना कुणाची? वाद सर्वोच्च न्यायालयात

खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत कागदपत्र सादर करण्याचे आदेश ठाकरे आणि शिंदेंना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या नोटीसीविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर आता 1 ऑगस्टला सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

‘रामदास कदम नावाची तोफ पुन्हा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी’

माजी मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.

Eknath Shinde and Ramdas Kadam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशाने सुरु करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.