राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार, ‘या’ 4 जणांना मंत्रिपदाची संधी; सुत्रांची tv9 मराठीला माहिती
State Cabinet Expansion : 'या' आमदारांचं मंत्रिपद निश्चित; राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत टीव्ही 9 मराठीची एक्सक्ल्युझिव्ह बातमी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न मागच्या कित्येक महिन्यापासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले तरी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. पण आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. तसंच चार मंत्र्यांचं नावं निश्चित झाली असल्याचंही कळतं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपतील सात आणि शिवसेनेतील सात जणांना संधी मिळणार आहे. शिवसेनेतील चार जणांची नावं सुत्रांकडून टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत. तर इतरांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत.
या महिना अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. तसंच या मंत्रिमंडळ विस्तात चार आमदारांचं मंत्रिपद निश्चित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या चार जणांना संधी
अनिल बाबर, आमदार, शिवसेना
भरत गोगावले, आमदार, शिवसेना
संजय रायमुलकर, आमदार, शिवसेना
बच्चू कडू, आमदार, अपक्ष
या तिघांच्या नावाबाबत अद्याप निर्णय नाही
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम या तिघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मात्र या तिघांच्या नावाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मंत्रिमंडळ विस्तार हा या महिन्याच्या अखेरीला होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, असं विचारलं असता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
अखेर बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची चिन्हे
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच अपक्ष आमदार बच्चू यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. बच्चू कडू यांनीही याबाबत अनेकदा आपलं मत बोलून दाखवलं. दिव्यांग खात्याचा कारभार आपल्याला मिळावा, असंही ते अनेकदा म्हणाले आहेत. दरम्यान याआधीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री होते. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी, असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. जाहीर सभांमध्येही त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. आता अखेर बच्चू कडू यांना संधी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.